Breaking News

जेएनयू हल्ल्याशी संबधितांचे मोबाईल जप्त करा दिल्ली उच्च न्यायालयाचे आदेश


नवी दिल्ली ः दिल्लीतील जवाहरलाल नेहरु विद्यापीठात झालेल्या हिंसाचार प्रकरणावर मंगळवारी दिल्ली हायकोर्टात सुनावणी झाली. या सुनावणी दरम्यान, जेएनयू हिंसाचाराशी जोडलेल्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपच्या सदस्यांना समन्स जारी करुन त्यांचे मोबाईल जप्त करण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत. दुसरीकडे, गुगल आणि व्हॉट्सअ‍ॅपला डेटा सुरक्षित ठेवण्यास सांगितले आहे. तसंच, पोलिसांनी मागवलेले सीसीटीव्ही फुटेज लवकरात लवकर उपलब्ध करून देण्याच्या सूचना जेएनयूला कोर्टाने दिल्या आहेत.
मंगळवारी सुनावणी दरम्यान हायकोर्टाने गुगल आणि व्हॉट्सअ‍ॅपला सांगितले की, ते त्यांच्या धोरणानुसार ईमेल आयडीच्या आधारावर ग्राहकांच्या मूलभूत माहितीच्या आधारे डेटा जतन करा. दरम्यान, जेएनयूमध्ये 5 जानेवारी रोजी हिसांचाराची घटना घडली होती. हिंसाचार प्रकरणातील सीसीटीव्ही फूटेज आणि डेटा सुरक्षित ठेवण्याची मागणी करत जेएनयूच्या तीन प्राध्यापकांनी दिल्ली हायकोर्टात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सुनावणी करताना दिल्ली हायकोर्टाने पोलिस, गुगुल आणि व्हॉट्सअ‍ॅपला उत्तर मागितले आहे.