Breaking News

शेवगाव - पैठण रस्ता होतोय अपघातांचे केंद्रबिंदू
घोटण/प्रतिनिधी:
 शेवगाव-पैठण हा राज्य महामार्ग मराठवाड्याचे प्रवेशद्वार आहे. परंतु मागील काही दिवसांपासून रस्त्याची अवस्था दयनीय झाली आहे. रस्त्यावर मोठ-मोठे खड्डे पडले आहेत. महामार्ग असल्याने वाहनांची रीघ सातत्याने सुरु असते. परिणामी या खड्ड्यांमुळे अपघाताचे प्रमाण वाढत चालले आहे.
 सध्या ऊस गाळप चालू असल्याने रस्त्यावर प्रचंड गर्दी असते. अवजड वाहतूक महामार्गावरील वाहतूक या सर्वामुळे या ठिकाणी गर्दी असते. रस्त्याच्या दयनीय अवस्थेमुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे.  सार्वजनिक बांधकाम विभागाकडे रस्ता दुरुस्तीची मागणी सातत्याने होत असून देखील कुठलीच कार्यवाही होताना दिसत नाही. डागडुजी साठी टाकलेली खडी इतर रस्ता दुरुस्तीचे साहित्य धूळ खात  रस्त्याच्या दुतर्फा पडलेले दिसत आहे. तालुक्यात इतर ठिकाणी अनेक रस्त्यांच्या कामाचे ऑडिट झालेले असतानादेखील काम मात्र अनेक ठिकाणी बंद आहे. यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड रोष असून नागरिक आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत