Breaking News

दत्तनगर येथील तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या


टिळकनगर \ प्रतिनिधी
श्रीरामपूर तालुक्यातील दत्तनगर कार्यक्षेत्रातील रमानगर येथील गोकुळ अशोक कनगरे वय (२८) या तरुणाने आपल्या राहत्या घरी आत्महत्या केली. परंतु त्याच्या नातेवाईकांनी गोकुळचा मृत्यू हा संशयास्पद असूूून, गोकुळने दबावाखाली आत्महत्या केली असल्याने सदर प्रकरणाची सखोल चौकशी करून आरोपींना गजाआड करण्याची मागणी केली. यासाठी मयत गोकुळच्या नातेवाईकासह ग्रामस्थांनी दोन तास ठिय्या आंदोलन केले.
गोकुळ अनेक वर्षांपासून बांधकाम मजुरीचे काम करत होता. आई, गोकुळ याची वागणूक सोमवारी दिवसभर सर्वसामान्यप्रमाणे होती. गुरुवारी संध्याकाळी पाचच्या दरम्यान शहरातील हुसेनगर भागांतील एका जोडप्यासह सहा ते सात तरुण मयत गोकुळ याच्या रमानगर येथील राहत्या घरी आले. तू आमचा मोबाईल चोरून आणला असून, आमचा मोबाईल परत दे असे म्हणत दमदाटी केली. शिवीगाळ करून दबाव आणण्याचा प्रयत्न केला व तेथून निघून गेले. व लगेचच एका तासाने मयत गोकुळने घरातील छताला. साडीच्या सहाय्याने  गळफास घेऊन आत्महत्या केली असून, यांस हुसेनगर येथील जोडप्यासह सहा ते सात तरुण जबाबदार आहेत, असे नातेवाईक आणि ग्रामस्थांचे म्हणणे आहे.