Breaking News

माजीमंत्री आ. विखे पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे १८ कोटी २८ लाख रूपयांची मदत


राहाता / प्रतिनिधी
ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महीन्यात तालुक्यात  अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या तालुक्यातील  सुमारे २५  हजार  शेतक-यांना माजी मंत्री आ. राधाकृष्ण विखे यांच्या पाठपुराव्यामुळे  १८ कोटी २८  लाख रूपयांची मदत प्राप्त झाली. तालुक्यात  झालेल्या अवकाळी पावसाने तालुक्यातील शेती आणि फळबागांचे मोठ्या प्रमाणात नूकसान झाले होते.  माजी मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेल्या काळजीवाहू सरकारने शेतकऱ्यांना मदतीची घोषणा केली होती. माजी मंत्री आ. विखे यांनी तालुक्यातील नूकसान झालेल्या शेती पिकांची प्रत्यक्ष बांधावर जाऊन पाहाणी केली होती. नूकसान झालेल्या शेती पिकांचे वस्तूनिष्ठ पंचनामे करून अहवाल पाठविण्याचे निर्देश त्यांनी महसूल व कृषी विभागाला दिले होते.
दरम्यान, नुकसानीच्या प्राप्त  झालेल्या अहवालानूसार आ. विखे पाटील यांनी शेतक-यांना मदत तातडीने मिळावी म्हणून प्रशासकीय स्तरावर पाठपुरावा सुरू ठेवला. तालुक्यातील एकूण २५ हजार ७४७  शेतकर्याना १८ कोटी २८ लाख  रूपयांचे अनुदान प्रात्प झाले आहे. मिळालेले  अनुदान शेतकर्यांच्या खात्यात वर्ग करण्यात आले असल्याचे सांगण्यात आले. माजी मंत्री आ. विखे यांनी मदत मिळवून देण्याची ग्वाही नुकसान झालेल्या शेतक-यांना दिली होती. अडचणीत सापडलेल्या या शेतक-यांना या मदतीचा मोठा दिलासा मिळवून दिल्याबद्दल शेतक-यांनी विखे यांचे आभार मानले.