Breaking News

सडक सुरक्षा सप्ताहनिमित्त विध्यार्थ्यांनी केली जनजागृती


कोपरगाव \ प्रतिनिधी
शहरात ३१ व्या राष्ट्रीय सडक सुरक्षा सप्ताह निमित्ताने ग्लोबल कॉलेज ऑफ फायर इंजिनिअरिंग &  सेफटी मॅनेजमेंट या संस्थेच्या विध्यार्थ्यांनी कोपरगाव शहरातील चौकाचौकात पथनाट्य सादर केले.  सुरक्षितता पाळण्याचे आवाहन करणारे फलक घेऊन फेरी काढण्यात आली तसेच सुरक्षा पाळण्याची शपथ देऊन जनजागृती केली.
रस्ते अपघातात अनेकांना जीव गमवावा लागतो व कुटुंबातील कर्ता व्यक्ती गेल्याने कुटुंबाचे मोठया प्रमाणावर नुकसान होते. त्याकरिता सुरक्षितता  पाळण्याची गरज असल्याचे सांगून यावेळी सर्वांना शपथ देण्यात आली. याप्रसंगी माजी नगराध्यक्ष शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजाभाऊ झावरे, कॉन्ट्रॅक्टर अनिलभाऊ सोनवणे, संस्थेचे संचालक अशोक कानडे, अनिल कानडे, सागर पोटे, शिक्षक कृष्णा सातपुते, रुख्मिनी भास्कर, कलविंदर दडियाल, युवासेनेचे उपजिल्हाप्रमुख गणेश जाधव, विक्रांत झावरे यांच्यासह असंख्य नागरीक व कार्यकर्ते उपस्थित होते.
पथनाट्य सादरिकरणात-पवन कदम, दुर्गेश साळुंके, पंकज आहेर, रामेश्वर कानडे, घनश्याम कुऱ्हे, बाजीराव गोंडे, सुमित शिंदे, रोहित लबडे, रुपेश साबळे, गणेश सांगळे, संतोष नरोडे या विद्यार्थ्यांनी भाग घेतला.