Breaking News

पांचाळे येथे गंगागिरी महाराज सप्ताहस्थळाची पाहणी सराला बेटाचे रामगिरी महाराजांची भेट


कोपरगाव/ शहर प्रतिनिधी ः
सिन्नर तालुक्यातील पांचाळे येथे सराला बेटाचे महंत रामगिरी महाराज यांनी भेट देऊन गंगागिरी महाराज यांच्या 173व्या अखंड हरिनाम सप्ताह स्थळाची पाहणी केली.
 नारायणगिरी महाराजांच्या कार्यकाळापासून सिन्नर तालुक्यात सप्ताह मिळावा, अशी मागणी होत आहे. परंतु त्यांच्या काळातही सिन्नरकरांना सप्ताह  मिळालेला नाही. परंतु रामगिरी महाराजांनी येथे स्थळपाहणी केल्याने आता सप्ताह येथेच होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
गंगागिरी महाराज यांचा अखंड हरिनाम सप्ताह कोणत्या गावाला दिला याची अधिकृत घोषणा पुणतांबा येथे आषाढी एकादशीला केली जाते. परंतु सप्ताहाचे नियोजन मोठे असल्याने व खर्चही मोठा असल्याने संपूर्ण सोयीसुविधा व व्यवस्था करण्यासाठी जास्त कालावधी लागतो. त्यामुळे सप्ताहाची तयारी करण्यासाठी पाच ते सहा महिने अगोदर बैठक घेऊन काम सुरू करावे लागते. या पार्श्‍वभूमीवर सिन्नर तालुक्यातील पांचाळे व पंचक्रोशीतील गावकर्‍यांनी पांचाळे व पंचक्रोशीतील भाविकांच्या नेतृत्वात सप्ताहाची मागणी गीता जयंतीच्या मुहूर्तावर रामगिरी महाराजांकडे केलेली आहे. आपला परिसर सोडून नवीन ठिकाणी सप्ताह झाला पाहिजे, असे काही भक्तांना वाटते.
सप्ताहस्थळ पाहणीवेळी जिल्हा परिषद सदस्य सीमंतिनी कोकाटे, पंचायत समिती सदस्य विजय गडाख, बाबासाहेब कांदळकर,   शिवाजी भालुरकर, शिवाजी ठाकरे, रविदास जगदाळे, विश्राम ढमाले महाराज, किशोर खरात, रेखा काकड, बाबासाहेब पगार, सोपान वायकर, गणेश श्रीमंत, दत्तू पवार, भागवत गाढे, विनायक घुमरे, नितीन कोकाटे, राजेंद्र डुंबरे, वाल्मीक हांडोरे, नवनाथ गडाख, नागेश गोर्डे, वैभव वेलजाळी, गोरख कासार, नीलेश पगार, बाळा काळे, गणेश क्षत्रिय, पोपट थोरात, जयराम थोरात, विठ्ठल थोरात, विठ्ठल जाधव, लक्ष्मण थोरात, बाळासाहेब थोरात, सीताराम फटांगरे, गणेश थोरात, अनिल शिरसाठ, पितू मालपाणी, रामू थोरात, शिवाजी तुपे, शिवा आसळक, निवृत्ती गीते, राहुल थोरात, जालिंदर थोरात, भारत वाघ उपस्थित होते.
लाखो भाविकांचा सहभाग...
सद्गुरु गंगागिरी महाराज यांच्या अखंड हरिनाम सप्ताहाची परंपरा 172 वर्षांपासून सुरू आहे. अहमदनगर, नाशिक, औरंगाबाद येथे गंगागिरी महाराज यांचा भक्त परिवार मोठ्या प्रमाणावर आहे. दरवर्षी या सप्ताहात लाखो भाविक सहभागी होत असतात. सात दिवस अखंड हरिनामाबरोबरच अन्नदान, कीर्तन, प्रवचन होत असते. हा सप्ताह आपल्या गावाला मिळावा, अशी अनेक गावांची मागणी असते.