Breaking News

भाजपने गरिबांच्या पोटावर लाथ मारली महागाईवरुन काँगे्रस नेत्या प्रियंका गांधी यांचा निशाणा


नवी दिल्ली ः महागाई, आर्थिक मंदीच्या मुद्द्यावरून काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे. किरकोळ महागाई दर 7.35 टक्क्यांनी वाढल्यावरुन प्रियांका गांधी यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. ’भाजपने गरिबांचा खिसा कापून त्यांच्या पोटावर लाथ मारण्याचे काम केले’, असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.
सुधारित नागरिकत्व कायदा (सीएए) आणि महागाईवरून काँग्रेसकडून सातत्याने केंद्र सरकारवर टीका केली जात आहे. त्यात आता खाद्य पदार्थांसह इंधनाच्या किंमतीत वाढ झाल्याने, किरकोळ महागाई दराने  पाच वर्षांमधील उच्चांक गाठला आहे. यावरून काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांना भाजपावर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे. भाजपाने खिसा कापून, पोटावर लाथ मारली असल्याचा आरोप त्यांनी केंद्र सरकारवर के ला आहे. भाज्या, खाद्यपदार्थांच्या किंमती सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर जात आहेत. जर भाज्या, तेल, दाळ व धान्य महागले तर गरीबाने खावं तरी काय? त्यात आर्थिक मंदीमुळे गरिबांना काम देखील मिळत नाही. भाजपा सरकारने तर खिसा कापून पोटावर लाथ मारली आहे. असे प्रियंका गांधी यांनी ट्विट केले आहे. देशातील किरकोळ महागाई दराने गेल्या पाच वर्षांतील उच्चांक गाठला आहे. डिसेंबर 2019 मध्ये 7.35 टक्क्यांवर झेपावताना किरकोळ महागाई दर रिझव्र्ह बँकेकडून अंदाजित अशा 4 टक्क्यांच्या जवळपास दुप्पट स्थिरावला. भाज्यांच्या किमती वाढल्याने महागाई दराचा भडका उडाला आहे. सलग  तिसर्‍या महिन्यात चलनवाढ रिझव्र्ह बँकेच्या सुरक्षित मर्यादेपेक्षा (4 टक्के) वर नोंदवली गेली. अर्थव्यवस्थेचा दर गेल्या सहा वर्षांच्या तळात असतानाच महागाईने डोके वर काढले आहे. भाज्या तसेच  खाद्यान्नाच्या वाढत्या किमतीमुळे महागाई दर आता रिझव्र्ह बँकेच्या सुरक्षित अशा 4 टक्क्यांच्याही पुढे गेला आहे. महागाईपेक्षा आर्थिक विकासावर लक्ष केंद्रित करत रिझव्र्ह बँकेने यंदा दरकपात टाळली होती. जगभर आणि विशेषत पश्‍चिम आशियातील तणावाच्या झळा बसू लागल्या आहेत. कच्च्या तेलाच्या किमती आणखी भडकल्या, तर परिस्थिती अधिकच हाताबाहेर जाईल, अशी दाट शक्यता आहे.