Breaking News

कामगार तलाठी कामावर अनुपस्थित ; कार्यालयीन कामाचा झाला बट्ट्याबोळ


कुकाणा  / प्रतिनिधी
नेवासा तालुक्यातील कूकाणा येथील तलाठी कार्यालयात परिसरातील नागरिकांना शेतकऱ्यांवर दहा दिवसापासून कामासाठी हेलपाटे मारण्याची वेळ आली आहे. सतत अनुपस्थित असणारे तलाठी मात्र जाणीवपूर्वक निष्काळजीपणाने काम करत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. कूकाणा कामगार तलाठी कामावर गैरहजर असल्याने कार्यालयीन कामाचा मात्र पुरता बट्ट्याबोळ झाला आहे. 
गेली दहा दिवसापासून सामाजिक कार्यकर्ते आसिफ सय्यद हे आपल्या कामासाठी हेलपाटे मारत असल्याचे त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. तसेच परिसरातील नागरिकांनी याबाबत कूकाणा मंडल अधिकारी फुलमाळी यांना हे निवेदन दिले. या निवेदनावर मनसेचे किरण शिंदे, आसिफ सय्यद, रामकिसण कराळे, किशोर थोरे, सुदर्शन घोडेचोर आदींच्या सह्या आहेत. या निवेदनात सय्यद यांनी मौजे देवसडे जेऊर व संबधित या गावांसाठी  स्वतंत्र तलाठी नेमण्यात यावे, अशी मागणीदेखील केली आहे. दरम्यान, सदरची मागणी पूर्ण न केल्यास कुकाणे याठिकाणी बेमुदत उपोषण केले जाईल, असा इशारा आसिफ सय्यद यांनी दिला आहे .