Breaking News

शिक्षकांनी शैक्षणिक गुणवत्तावाढीसाठी प्रयत्न करावेत : शेळके शिक्षक सहकारी बँकेला दिली सदिच्छा भेट


अहमदनगर / प्रतिनिधी
जिल्हा परिषद शाळातील शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यात शिक्षकांचे मोलाचे योगदान आहे. प्राथमिक शिक्षकांचे अनेक प्रश्न प्रलंबित असून जिल्हा परिषदेच्या स्तरावरील प्रश्नांची लवकरात लवकर सोडवणूक करण्याचा प्रयत्न राहिल. राज्यस्तरावरील प्रश्न सोडविण्यासाठी राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येईल. जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेलाही सहकार्य करण्याची भूमिका ठेवणार असून शिक्षकांनीही आपले कर्तव्य पार पाडताना शिक्षणाचा दर्जा आणि गुणवत्तावाढीसाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रताप शेळके यांनी केले.
अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेच्या शताब्दी महोत्सवनिमित्त जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रताप शेळके यांनी नुकतीच बँकेच्या कार्यालयास भेट दिली. यावेळी त्यांचे स्वागत सत्कार करण्यात आला. यावेळी चेअरमन संतोष दुसुंगे, व्हाईस चेअरमन नानासाहेब बडाख, संचालक साहेबराव अनाप, बाळासाहेब मुखेकर, किसनराव खेमनर , विद्युल्लता आढाव, सीमा क्षीरसागर, संतोष अकोलकर, दिलीप औताडे, सुयोग पवार, अविनाश निंभोरे, राजु मुंगसे, शरद सुद्रिक, बाबासाहेब खरात, सलीमखान पठाण, राजु राहणे, गंगाराम गोडे, अर्जुन शिरसाट, उषा बनकर, मंजुषा नरवडे, मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण देशमुख, उपमुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप मुरदारे, शिक्षक नेते बापूसाहेब तांबे, प्रवीण ठुबे, आबासाहेब जगताप, विठ्ठल फुंदे, दत्तात्रय कुलट, नारायण पिसे, बाळासाहेब सरोदे, बाळासाहेब कापसे, रामेश्वर चोपडे आदी उपस्थित होते.
चेअरमन दुसुंगे म्हणाले, की नगर जिल्हा शिक्षक बँकेला शंभर वर्षांची परंपरा असून प्राथमिक शिक्षकांची कामधेनू म्हणून बँकेची ओळख आहे. शिक्षक सभासदांच्या हिताचे निर्णय घेवून त्यांना आर्थिक आधार देण्याचे काम बँकेमार्फत चालू आहे. जिल्हा परिषदेचे नूतन उपाध्यक्ष प्रताप शेळके यांना शिक्षकांच्या विविध प्रश्नांची पूर्ण माहिती असून त्यांनी अनेक प्रश्न सोडविण्याचे आश्वासन आपल्या बँक भेटीत दिले आहे. बँकेच्या कामकाजाचे त्यांनी कौतुक करून आम्हाला चांगले प्रोत्साहन पाठबळ दिल्याने विशेष आनंद होत आहे. शेवटी व्हाईस चेअरमन नानासाहेब बडाख यांनी आभार मानले.