Breaking News

... आणि 'एसपी' कार्यालयात अचानक झाली पळापळ! कार्यालयीन अधीक्षक आणि लिपिकामध्ये कुरबुर!


अहमदनगर /  बाळासाहेब शेटे
जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात आज, दि. १३ दुपारी वरिष्ठांची अचानक पळापळ झाली. या कार्यालयातील ओ. एस. अर्थात कायालयीन अधीक्षक आणि त्यांचा सहकारी असलेल्या एका क्लार्कमध्ये कामावरून ताणतणाव निर्माण झाला. दररोजच्या या कटकटीला कंटाळून सदर क्लार्कने ' ओ. एस.  साहेबांच्या रोजच्या त्रासाला कंटाळून मी आत्महत्या करतोय' असा संदेश चक्क वरिष्ठांनाच व्हाट्सअप केला. हा कर्मचारी खरोखरंच टोकाची भूमिका घेतो की काय, या भीतीने वरिष्ठांनी कर्मचाऱ्यांना सदर क्लार्कची मनधरणी करायला पिटाळले आणि जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात अचानक काहीवेळ चांगलीच पळापळ झाली.
जिल्ह्यातील पोलिसांच्या रिवार्डची नोंद ठेवणे, पगारबिलांची नोंद ठेवणे, जिल्ह्यातील पोलीस ठाण्यांना लागणाऱ्या विविध प्रकारच्या साहित्यांची नोंद ठेवणे आदी कामांसाठी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात जो विभाग कार्यरत आहे, त्या विभागाच्या कार्यालयीन अधीक्षकांचा रोजच मानसिक त्रास सहन करावा लागत असल्याची या क्लार्कची तक्रार आहे. यासंदर्भात वरिष्ठांकडे तक्रारी करण्याचादेखील या क्लार्कने प्रयत्न केला. मात्र फारसा प्रतिसाद मिळाला नाही. परंतु हा मानसिक त्रास रोजच वाढत चालला असून तो कुठपर्यंत आणि कशासाठी सहन करायचा, या मानसिकतपर्यंत येऊन थांबलेल्या या क्लार्कने वरिष्ठांनाच एक एसएमएस केला. त्यात त्याने म्हटले, 'सर, ओ. एस. साहेबांच्या मानसिक त्रासाला मी पुरता कंटाळलो आहे. प्रत्येक कामात त्रुटी काढण्याच्या त्यांच्या पद्धतीने मला खूप संताप होतोय. त्यामुळे या रोजच्याच कटकटीला कंटाळून मी आत्महत्या करतोय'. दरम्यान, हा मेसेज पाहताच वरिष्ठांनी तातडीने अन्य कर्मचाऱ्यांना संबंधीत क्लार्कला शोधून तो टोकाची भूमिका घेण्यापूर्वीच त्याची मनधरणी करण्याचे आदेश दिले. बऱ्याचवेळ सदर क्लार्कची मनधरणी केल्यानंतर या प्रकरणावर अखेर  पडल्याचे सांगण्यात आले.
दोघांत कुरबुरी झाल्या ; पण यात तथ्य नाही
हा कार्यालयीन कामकाजाची बाब आहे. काम करत असताना थंडी फार 'इकडे तिकडे' होतच असते. मात्र अशी काही तक्रार कोणी केली नाही. परंतू येथील कार्यालयीन अधीक्षक आणि क्लार्क यांच्यामध्ये थोड्याशा कुरबुरी झाल्याचे समजले. अधिक माहिती घेतली आहे. मात्र सदर क्लार्क आत्महत्या करण्यापर्यंतच्या निर्णयाप्रत गेल्याच्या घटनेत काहीही तथ्य नाही.
सागर पाटील, प्रभारी जिल्हा पोलीस अधीक्षक, अहमदनगर.