Breaking News

नगर- सोलापूर रस्त्याची दुरुस्ती सुरु


मिरजगाव/प्रतिनिधी ः
कर्जत तालुक्यातील मिरजगाव येथून जाणार्‍या नगर-  सोलापूर रस्त्याच्या दुरुस्तीस सुरुवात झाली.
या परिसरातील धुळीचे साम्राज्य व रस्त्याच्या दुरुस्तीसाठी प्रहार जनक्रांती संघटनेने 15 दिवसांपूर्वी रास्तारोको आंदोलन केले होते. या आंदोलनात प्रहारचे तालुकाध्यक्ष राजेंद्र गोरे, बबन मस्के, बाळासाहेब गाडे, युनायटेड रिपब्लिकन पक्षाचे तालुकाध्यक्ष कुलदीप गंगावणे, शहराध्यक्ष विशाल घोडके, मिरजगावचे उपसरपंच अमृत लिंगडे, सुभाष सूर्यवंशी, पंढरीनाथ गोरे, अमोल माने, सागर पवळ, सलीम आतार व इतर कार्यकर्ते सहभागी झाले होते.
नगर- सोलापूर मार्गावरील खड्डे बुजवावेत, अशी मागणी आंदोलनातून करण्यात आली होती. सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी कडूस व मेत्रे यांनी मिरजगाव येथे येऊन कार्यकर्त्यांची भेट घेतली होती. लवकरात लवकर या रस्त्याचे काम नव्याने करण्याचे लेखी आश्‍वासन त्यांनी  दिले होते. त्यानुसार शनिवारी या रस्त्याच्या कामास सुरुवात झाली.