Breaking News

युवा वर्गच देशात क्रांती घडवू शकतो : अ‍ॅड. होले

अहमदनगर/प्रतिनिधी : “देशाची खरी ताकद युवाशक्ती असून, युवावर्गच क्रांती घडू शकतो. भारतात युवाशक्ती मोठ्या प्रमाणात असून, त्यांना योग्य दिशा देण्याची गरज आहे.’’, असे प्रतिपादन ज्येष्ठ विधीज्ञ अ‍ॅड.भानुदास होले यांनी केले.
भारत सरकारच्या नेहरू युवा केंद्र, द युनिव्हर्सल फाउंडेशन व राष्ट्रीय मानवाधिकार सुरक्षा संघाच्या वतीने स्वामी विवेकानंद आणि राजमाता जिजाऊ यांच्या
जयंतीनिमित्त नगर-औरंगाबाद महामार्गावरील भीमा गौतमी वसतिगृहात राष्ट्रीय युवा सप्ताहाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी अ‍ॅड. होले बोलत होते.
यावेळी नेहरू युवा केंद्राचे वरिष्ठ लेखाधिकारी देविदास साळवे, रमेश गाडगे, राष्ट्रीय मानवाधिकार सुरक्षा संघाचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.महेश शिंदे, अ‍ॅड. प्रणाली चव्हाण, ह.भ.प. अ‍ॅड.सुनील महाराज तोडकर, राष्ट्रपती आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त डॉ.अमोल बागूल, आधारवड संस्थेच्या अ‍ॅड.अनिता दिघे, नयना बनकर, पोपटराव बनकर, जय युवाचे दिनेश शिंदे, जयेश शिंदे, सामाजिक कार्यकर्ते मिलिंद डंबे, प्रीती औटी, कार्यक्रमाचे मुख्य संयोजक युनिव्हर्सल फाऊंडेशनचे सागर अलचेट्टी, अदिती उंडे, वसतिगृहाच्या अधीक्षिका रजनी जाधव आदींसह युवती मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
युवा सप्ताहाचे मार्गदर्शक नेहरू युवा केंद्राचे जिल्हा युवा समन्वयक शिवाजीराव खरात यांनी उपस्थितांना युवा दिनाच्या शुभेच्छा दिल्या. सूत्रसंचालन सागर अलचेट्टी यांनी केले. आभार रजनी ताठे यांनी मानले. युवा सप्ताह यशस्वी करण्यासाठी अ‍ॅड. पुष्पा जेजूरकर, अ‍ॅड. गौरी सामलेटी, सिमोन बनकर, स्वाती बनकर, प्रियंका ताठे, धीरज ससाणे, वंदना शिंदे, दर्शन बनकर आदींनी परिश्रम घेतले.