Breaking News

सर्वधर्मसमभाव आणि स्वच्छतेचे प्रत्यक्ष दर्शन : अभिनेत्री कोईराला ; मेहरबाबाच्या समाधीचे घेतले दर्शन


अहमदनगर / प्रतिनिधी
अवतार मेहरबाबांच्या समाधीच्या ठिकाणी मौन पाळले तर मनाला शांती मिळते. त्यामुळे जगभरातून लोक येतात. जगभरात शांतता नांदावी, माणूसपण जपलं जावं, म्हणून अवतार मेहेरबाबांनी संपूर्ण आयुष्यभर प्रयत्न केले. येथे असलेला सर्वधर्मसमभाव, स्वच्छता काय असते, हे आज प्रत्यक्ष पाहिले, असे प्रतिपादन प्रसिद्ध अभिनेत्री  मनीषा कोईराला यांनी केले.
मेहेरबाबांच्या समाधीचे दर्शन घेतल्यानंतर त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. विश्वस्त रमेश जंगले यांनी त्यांचे स्वागत करून सर्व माहिती दिली. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष श्रीधर केळकर, विश्वस्त मेहेरनाथ कलचुरी मेहेरप्रेमी उपस्थित होते. सामान्य भाविकांप्रमाणे बराच वेळ त्यांनी येथे व्यतित केला. मौन पाळले, प्रार्थना केली आणि मेहेरबाबा समाधी याविषयी माहिती घेतली.