Breaking News

जि. प. समाजकल्याण समितीच्या सभापदी उमेश परहर यांना पुन्हा संधी सर्वच विषय समित्यांच्या निवडी बिनविरोध


अहमदनगर / प्रतिनिधी
जिल्हा परिषदेच्या विषय समिती सभापतीपदी उमेश परहर, सुनिल गडाख, काशिनाथ दाते, मिरा शेटे यांची बिनविरोध निवड झाली. निवडीनंतर त्यांचा  राष्ट्रवादीचे निरीक्षक अंकुश काकडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी जि. . अध्यक्षा राजश्री घुले, माजी . विजय औटी, माजी . चंद्रशेखर घुले, कैलास वाकचौरे, अजय फटांगरे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, उपाध्यक्ष प्रताप शेळके, सत्यजित तांबे, प्रशांत गडाख, किसनराव लोटके, संजय कोळगे आदी उपस्थित होते.
जिल्हा परिषद विषय समित्यांच्या सभापती निवडी बिनविरोध झाल्या. समाजकल्याण समितीच्या सभापदी उमेश परहर (राष्ट्रवादी, कर्जत) यांना पुन्हा संधी मिळाली. महिला बालकल्याण समितीच्या सभापती मिराताई शेटे (काँग्रेस संगमनेर), अर्थ बांधकाम आणि कृषी पशुसंवर्धन समितीच्या सभापतीपदी अनुक्रमे सुनील गडाख (क्रांतीकारी शेतकरी पक्ष नेवासा, काशिनाथ दाते (शिवसेना, पारनेर) यांची निवड झाली. अर्ज छाननीत सर्वच्या १५ अर्ज वैध ठरले. १५ पैकी ११ जणांनी अर्ज मागे घेतल्याने चारही विषय समित्यांच्या निवडी बिनविरोध झाल्या. दरम्यान, सर्वच नूतन पदाधिकाऱ्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.