Breaking News

श्रीसमर्थ पादुका दौरा ही प्रबोधनाचीच चळवळ : ह. भ. प. भरतबुवा रामदासी


अहमदनगर / प्रतिनिधी
सज्जनगड येथील श्रीरामदासस्वामींचा मठ ३७० वर्षांचा इतिहास परंपरा असलेला असून या मठामधून प्रतीवर्षी मार्गशीर्ष महिन्यातील चंपाशष्ठीपासून श्रीसमर्थ रामदास स्वामी पादुका दौरा सुरू होतो. हा दौरा म्हणजे प्रबोधनाची चळवळच आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय किर्तनकार . . . भरतबुवा रामदासी यांनी केले.
येथील गायत्री मंदिरात श्रीसमर्थ पादुका आल्याने सुरू झालेल्या किर्तन सोहळ्यात ते बोलत होते. संयोजन समितीतर्फे समर्थभक्त मंदारबुवा रामदासी आणि सनातन धर्मसभेचे अध्यक्ष दत्तोपंत पाठक गुरूजी यांच्या हस्ते भरतबुवा रामदासी यांना गौरविण्यात आले.