Breaking News

ऐश्वर्या वाघ हिचा क्रांतीज्योती सावित्री फुले पुरस्काराने गौरव


अहमदनगर / प्रतिनिधी
जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजाचे न्यू आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज अहमदनगर येथे १४ जानेवारी रोजी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती सोहळा साजरा करण्यात आला. महाविद्यालयातील तृतीय वर्ष वाणिज्य शाखेत शिकत असलेली ऐश्वर्या रविंद्र वाघ हिने शैक्षणिक गुणवत्तेवरबरोबरच क्रीडा क्षेत्रात नैपुण्य सिद्ध करून तायकांदो बॉक्सिंग या क्रीडा प्रकारांमध्ये आपले कौशल्य दाखविले. याबद्दल तिला विशेष मार्गदर्शन क्रीडा प्रमुख शरद मगर आणि  हराळ लाटे यांचे लाभले. शालेय जिल्हास्तरीय तसेच पंजाब, राजस्थान, मेरट येथे संपन्न झालेल्या आंतरमहाविद्यालयीन स्पर्धे बरोबरच पुणे येथे झालेल्या राष्ट्रीय खुल्या तायक्वांदो स्पर्धेत सहभाग घेत एक रौप्य १२ सुवर्णपदकांची ती ती मानकरी ठरली. याबद्दल संस्थेच्यावतीने तिचा गौरव करण्यात आला.
या सोहळ्यास प्रमुख अतिथी म्हणून अभ्यासक रजिया पटेल तर अध्यक्षस्थानी ऍड. दीपलक्ष्मी म्हसे होत्या. संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार झावरे, सचिव जी. डी.  खानदेशी, सहसचिव विश्वासराव आठरे, खजिनदार डॉ. विवेक भापकर, प्राचार्य डॉ. झावरे, एल. आर. हराळ, . के. पंदरकर, आर. जी. कोल्हे, समन्वयक डॉ. वैशाली भालसिंग आदींसह प्राध्यापक शिक्षक वृंद तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.