Breaking News

काते यांना स्वामी विवेकानंद पुरस्कार

अहमदनगर/प्रतिनिधी : येथील सामाजिक कार्यकर्ते साहेबराव काते यांना नुकतेच राज्यस्तरीय स्वामी विवेकानंद समाजगौरव पुरस्काराने गौरविण्यात आले. निमगाव वाघा (ता. नगर) येथे स्व.किसनराव डोंगरे बहुउद्देशीय सामाजिक संस्था व नवनाथ युवा मंडळाच्या वतीने आयोजित स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ जयंती कार्यक्रमात जिल्हा परिषद सदस्य माधवराव लामखडे यांच्या हस्ते काते यांना हा पुरस्कार देण्यात आला. 
यावेळी माजी सरपंच साहेबराव बोडखे, भागचंद जाधव, क्रीडा अधिकारी नंदकुमार रासने, बाळू पवार, अतुल फलके, अण्णा जाधव, अध्यक्ष नाना डोंगरे, सचिव मंदा डोंगरे, संदीप डोंगरे, शिवशाहीर विक्रम अवचिते, प्रतिभा डोंगरे आदी उपस्थित होते. यावेळी नवनाथ युवा मंडळाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.