Breaking News

हंगेवाडीत लिलावाविना सर्रास अवैध वाळू उपसा!


येळपणे / प्रतिनिधी
पर्यावरणाच्या विनाशाचा कुठलाही विचार करता  श्रीगोंदे तालुक्यात पुन्हा एकदा  प्रचंड वाळू उपसा सुरु झाला आहे. तालुक्यातील हंगेवाडी शिवारात असलेल्या नदीकाठच्या शेतजमिनीतून लिलावाविनाचोरी चोरी छुपके छुपके  जे सी बी पोकलेनच्या साहाय्याने दहा ते पंधरा डंपरद्वारे, ट्रक आणि ट्रॅक्टरद्वारे तालुक्याच्या विविध भागांत अवैध वाळूचा धंदा मोठ्या प्रमाणात सुरु आहे. तत्कालीन पोलीस जिल्हा अधीक्षक इशू सिंधू हे सुटीवर गेल्यानंतर लगेच हा धंदा सुरु झाला. या पार्श्वभूमीवर   जिल्हाधिकारी राहूल द्विवेदी या गंभीर बाबीकडे लक्ष देतील का, असा सवाल श्रीगोंदेकरांमधून उपस्थित होत आहे.