Breaking News

नगरपालिकेच्या विकास कामांचा वेग कायम : आ. थोरात संगमनेर/प्रतिनिधी 
संगमनेर तालुका विकास कामांत राज्यात अग्रेसर असून संगमनेर नगरपालिकेच्या वतीने शहरात सातत्याने विकासाचे स्वच्छतेचे विविध उपक्रम राबविले जात आहे. नगरपालिकेच्या वतीने नागरिकांना चांगल्या सुविधा दिल्या जात असून या कामांची दखल देश पातळीवरही घेण्यात आली आहे. नागरिकांचे आरोग्य हा केंद्र बिंदू मानून काम करतांना नगरपालिकेचा शहरातील विकास कामांचा वेग कायम असल्याचे प्रतिपादन महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.
 संगमनेर नगरपालिकेच्यावतीने शहरातील हॉटेल राज पॅलेस ते 132 के व्ही पर्यंतचा अकोले बायपास रस्ता जुना जोर्वे रस्त्याच्या डांबरीकरण कामाचा प्रारंभ .थोरात यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी .डॉ.सुधीर तांबे हे होते. तर व्यासपीठावर नगराध्यक्ष दुर्गा तांबे,  कांचन थोरात, कारखान्याचे संचालक इंद्रजित थोरात, विश्वास मुर्तडक, दिलीपराव पुंड, गजेंद्र अभंग, मुख्याधिकारी डॉ.सचिन बांगर आदी मान्यवर उपस्थित होते.
 यावेळी थोरात म्हणाले, संगमनेर नगरपालिकेने सातत्याने लोकाभिमुख काम करुन आपला राज्यात ठसा उमटविला आहे. स्वच्छतेबाबत जागृती करुन स्वच्छ हरित संगमनेर बनविण्यासाठी काम केले आहे. शहरात वैभवशाली इमारतींसह 28 नव्या गार्डनची निर्मिती, संगमनेर बाह्यवळण रस्ता, प्रवरा नदीवर चार पुल, रस्ते, भूमिगत गटारी, मोकळ्या जागांमध्ये वृक्षारोपण अशी विविध विकास कामे शहराचे वैभव ठरले आहे. संगमनेर नगरपरिषदेच्या वतीने शहरातील हॉटेल राज पॅलेस ते 132 के व्ही पयर्र्तचा अकोले बायपास रस्ता जुना जोर्वे रोड रस्त्याच्या डांबरीकरण कामामुळे नागरिकांची दळण वळणासाठी मोठी सोय होणार असल्याचेही ते म्हणाले.
 यावेळी किशोर टोकसे, सुनंदा दिघे, सुमित्रा दिड्डी, सोनाली शिंदे, प्रियंका भरीतकर, नुरमुहम्मद शेख, राजेश वाकचौरे, डॉ. दानिश खान, किशोर पवार,रुपाली औटी, योगिता पवार, शैलेश कलंत्री, सुहासिनी गुंजाळ, मालती डाके आदी मान्यवर उपस्थित होते