Breaking News

'भिंगार अर्बन'ला सक्षम बँकेचा पुरस्कार प्रदान


भिंगार \ प्रतिनिधी  
अहमदनगर शहरात मागील शतकापासून  सभासदांच्या आर्थिक उन्नतीचे प्रमाणिक प्रयत्न करीत असलेल्या भिंगार अर्बन सहकारी बँकेला 'नाशिक अर्बन बँक असोसिएशन, नाशिक'चा सन २०१९ साठीचा सक्षम बँकेचा पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आला. महाराष्ट्र अर्बन बँक फेडरेशनचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर यांच्या हस्ते बँकेचे चेअरमन गोपाळराव झोडगे यांनी चेन्नई येथे हा पुरस्कार स्विकारला.
यावेळी नाशिक जिल्हा अर्बन  बँकस  असोसिएशनचे अध्यक्ष अजय ब्रम्हेचा, बँकेचे  व्हाईस चेअरमन किसनराव चौधरी, बँकेचे माजी चेअरमन नाथा राऊत, अनिल झोडगे, संचालक  विजय भंडारी, विष्णू फुलसौंदर, अमोल धाडगे, राजेंद्र बोरा, नामदेव लंगोटे आणि बँकेचे सरव्यवस्थापक पांडुरंग हजारे आदी उपस्थित होते. बँकेने आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरून खातेदारांना आधुनिक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. आर. टी. जी. एस.,  एन. ई. एफ. टी., एस. एम. एस. सुविधा यासारख्या सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. आर्थिक वर्ष २०१९ अखेर रिझर्व बँकेच्या निकषाप्रमाणे ताळेबंदाची मांडणी करून सर्व निकष पाळून  एन. पी. ए. नियमत राखल्याबद्दल बँकेला हा पुरस्कार प्राप्त झाला आहे. याचे सर्व श्रेय कर्जदार, खातेदार, ठेवीदार यांना जात असल्याचा उल्लेख चेअरमन गोपाळराव  झोडगे यांनी केला.