Breaking News

10 गावांतील साठवण बंधारे भरुन द्यावेत शेवगावच्या शेतकर्‍यांची पाटबंधारे विभागाकडे मागणी


शेवगाव/ प्रतिनिधी ः
तालुक्यातील ताजनापूर टप्पा क्रमांक एकमध्ये हसनापूर, खरडगाव, सालवडगाव, वरूर खुर्द, वरूर बुद्रुक, मुर्शदपूर, आखेगाव तितर्फा, डोंगर आखेगाव, वाडगाव, थाटे, बेलगाव या गावांचा समावेश करावा. बंद पाईपने या गावांतील साठवण बंधारे, तळे भरून द्यावेत, असे निवेदन गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विभागाचे कार्यकारी संचालक एन. व्ही. शिंदे यांना मंगळवारी औरंगाबाद येथे देण्यात आले.
             कार्यकारी संचालकांच्या कार्यालयात 10 गावांतील नागरिक एकत्र आले होते. जनशक्ती विकास आघाडीचे संस्थापक अध्यक्ष शिवाजी काकडे व जिल्हा परिषदेच्या सदस्य हर्षदा काकडे यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले.
  जगन्नाथ गावडे, देवराव दारकुंडे, विक्रम ढाकणे, जनार्दन ढाकणे, विश्‍वास ढाकणे, आदिनाथ लांडे, नारायण टेकाळे, प्रवीण म्हस्के, शंकर काटे, राजेंद्र लोणकर, गोरक्ष भोसले, रामदास केदार, श्यामराव ठोंबरे यावेळी उपस्थित होते.
यावेळी शिवाजी काकडे म्हणाले, शेवगाव तालुक्यातील 10 गावे ही दुष्काळी आहेत. ताजनापूर लिफ्ट टप्पा क्र.एक आज बंद अवस्थेत आहे. शासनाचा 65 कोटी रुपयांचा निधी या योजनेवर खर्च झाला आहे. त्याच योजनेमध्ये वरील 10 गावांचा समावेश करून या गावांचे साठवण बंधारे व तळे बंद पाईपद्वारे भरून दिले तर ही गावे ओलिताखाली येऊन शेतकर्‍यांच्या शेतीचा, चार्‍याचा व पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न कायमस्वरूपी सुटू शकतो. याच प्रश्‍नासाठी शरद पवार व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी 10 गावांच्या लोकांना पाणी देण्याबाबत सकारात्मक भूमिका घेतलेली आहे. त्यानुसार विनंतीप्रमाणे ही योजना सुरु करावी. 10 गावांचा समावेश या योजनेत करण्याचे नियोजन करावे, अशी मागणी काकडे यांनी केली.
ज्ञानेश्‍वर गोर्डे, श्रीरंग हुलजुते, अशोक कोल्हे, महादेव जवरे, नवनाथ काटे, नानासाहेब काटे, सुखदेव खंडागळे, शिवाजी औटी, एकनाथ ढाकणे, किसन ढाकणे, आदिनाथ ढाकणे, भाऊसाहेब बोडखे, तबाजी बोडखे, बळीराम शिरसाठ, बबन वावरे, रमेश चितळे, शहादेव जवरे, बाबाजी केदार, दादा पाचरणे, सुरेश म्हस्के, गणेश बेडके, विठ्ठल जायभाय यांच्यासह असंख्य  शेतकरी यावेळी उपस्थित होते.