Breaking News

वंचित औरंगाबाद मनपा निवडणुकीत 115 जागा लढवणार


औरंगाबाद : वंचित बहुजन आघाडी औरंगाबाद महानगरपालिका निवडणुकीत सर्व 115 जागा लढवणार आहे. उमेदवार निवडीसाठी तीन सदस्यांची समिती नेमली आहे. एमआयएम व वंचितची युती होणार नसून असा कोणताही प्रस्ताव आलेला नाही. तरीसुद्धा पक्ष धोरणात्मक निर्णय जाहीर करेल, असे वंचित बहुजन आघाडीच्या नेत्या अंजली आंबेडकर यांनी सांगितले.
विधानसभा मतदारसंघ मोठा असतो. महानरपालिकेत लहान वॉर्ड असल्याने समीकरणे बदलतात. एमआयएमचा अद्याप प्रस्ताव देखील नाही. औरंगाबादेत आमची मोठी ताकद आहे. त्यामुळे वंचितला औरंगाबादेत यश मिळेल. असा अम्हाला विश्‍वास असे त्या म्हणाल्या. वंचित बहुजन आघाडी येणार्‍या मनपा निवडणूकीत पूर्ण ताकदिनीशी लढणार आहे. पक्षाचा शहरात मोठा जनाधार आहे. विधान सभा, लोकसभा निवडणूकीचे समीकरण वेगळे असतात. त्या मुद्यांना घेवून शहरातील संपुर्ण 115 जागांवर आंम्ही लढणार आहे. सध्या कोणासोबतही युती झालेली नाही. प्रभाग पद्धतीत प्रतिष्ठीत समूहांची मोट बांधल्याने लहान पक्षांना फटका बसला होता. आता वॉर्डनिहाय निवडणूक असल्याने वंचितला फायदा होईल, वॉर्ड मुळे वंचित व इतरांना निवडून येण्याच्या संंभावना वाढल्या आहे. त्या मुळे प्रभाग पेक्षा वॉर्ड योग्य असेही आंबेडकर म्हणाल्या. वंचित बहुजन आघाडीच्या राष्ट्रीय नेत्या अंजली आंबेडकर यांनी नाव न घेता शरद पवारांवर टीका केली. त्या म्हणाल्या की, ज्यांना जाणते राजे, समंजस राजकारणी म्हटले जाते. त्यांना कोरेगाव भीमा घटनेनंतरच्या राजकीय घडामोडींचा राजकीय धक्का बसला. पण तेव्हापासून गप्प असलेल्या या जाणत्या राजांना कोरेगाव भीमा प्रकरण आताच का आठवले? बौद्धांना न्याय देण्याची आणि जवळ करण्याची भाषा ते कसे बोलू लागले आहेत? असा सवाल त्यांनी केला.