Breaking News

सलमान खानला संपवण्यासाठी 30 लाखांची सुपारी


मेरठ : उत्तर प्रदेश पोलिसांच्या एन्काऊन्टरमध्ये अटक झालेल्या शक्ती नायडू गँगच्या शार्प शूटरने खळबळजणक खुलासा केला आहे. सर्वांच्या गळ्यातील ताईत असलेला प्रसिद्ध अभिनेता सलमान खान याला मारण्यासाठी 30 लाखांची सुपारी घेतल्याची कबुली रवी भूरा याने पोलिसांना चौकशीवेळी दिली आहे. जानेवारी 2018 मध्ये जोधपूर न्यायालयात हजर झालेल्या सलमानला संपविण्यात येणार होते, असा धक्कादयक खुलासा करण्यात आला आहे.
मागिल आठवड्यात कंकरखेडामध्ये दीड लाखांचा इनाम असलेल्या शिव शक्ती नायडूला एन्काऊंटरमध्ये मारण्यात आले. मात्र, त्याचा साथीदार रवी मलिक उर्फ भूरा तेथून निसटला होता. रवी हा मुझफ्फरनगरच्या रायशी येथील राहणारा आहे. मात्र, तो दिल्लीमध्ये स्थायिक झाला होता. शुक्रवारी तो पुष्प विहारमध्ये असल्याचे पोलिसांना समजले होते. पोलिसांनी घेराव घालताच तो रेल्वे रोडच्या दिशेने पळून जाऊ लागला. तसेच पोलिसांवर त्याच्या माणसांनी गोळीबार केला. प्रत्युत्तरात रवीच्या पायाला गोळी लागली. मात्र, त्याच्यासोबतचे साथीदार पिंटू बंगाली आणि नितीन सैदपुरिया पळून गेले. रवी जखमी झाल्याने पोलिसांच्या हाती लागला. पोलिस चौकशीमध्ये रवीने मोठमोठे खुलासे केले आहेत. अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा याच्या कार्यालयातून रवीने 8 कोटी रुपये लुटले होते. यानंतरचा खुलासा सलमान खानची आणि त्याच्या शेराची झोप उडविणारा आहे. रवीने राजस्थानचा गँगस्टर संपत नेहरासोबत मिळून सलमान खानला कायमचे संपविण्याची सुपारी घेतली होती. हे केवळ तो 30 लाखांत करणार होता. 5 जानेवारी 2018 मध्ये काळवीट प्रकरणात सलमान खान न्यायालयात हजर राहणार होता. तेव्हा सलमानला मारण्याची धमकी गँगस्टर लॉरेन्स बिश्‍नोई याने दिली होती. आता रवीच्या दाव्यामुळे याचीही चौकशी केली जाणार असल्याचे पुलिस महासंचालक प्रशांत कुमार यांनी सांगितले. महत्वाचे म्हणजे संपत नेहरावर पाच लाखांचे बक्षिस होते. त्याला हैदराबाद पोलिसांनी अटक केली आहे. सध्या संपत तिहार जेलमध्ये आहे. 30 जानेवारीला या गँगचे काही जण मेरठच्या वैष्णो धामचे इन्स्पेक्टर विपीन आणि प्रॉपर्टी डीलरची हत्या करण्यासाठी आले होते. त्यानंतर दुसर्‍या दिवशी त्यांना दिल्लीचे एसीपी ललित मोहन नेगी यांना संपवायचे होते. नेगी यांनी शिव शक्तीवर मोक्का लावला होता. नेगी परतापूरमध्ये एका लग्न समारंभाला आले होते. मात्र, गँगचा एक सदस्य आणि नेगी यांचा पुतण्या असलेल्या तिलकराजने नेगी यांना मारण्यास नकार दर्शविला. यामुळे त्याची हत्या करण्यात आली.