Breaking News

सीमाशुल्क आयुक्ताच्या सात निवासस्थानांवर सीबीआयची धाडी उत्पन्नापेक्षा 376 पटींनी अधिक मालमत्ता असल्याचा दावानवी दिल्ली : सीबीआयने जीएसटी विभागाचे वादग्रस्त ठरलेले अतिरिक्त आयुक्त दीपक पंडित यांच्याविरुद्ध बेकायदेशीर संपत्ती गोळा केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला आहे. पंडित यांच्यासह त्यांची पत्नी आणि दोन मुलांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दीपक पंडित हे चित्रपट निर्माते अशोक पंडित यांचे भाऊ आहेत, हे येथे उल्लेखनीय.
सीबीआयने दीपक पंडित यांच्या मुंबईतील सहा निवासस्थानांवर आणि भुवनेश्‍वर येथील एका निवासस्थानावर आज धाड घातली. पंडित यांच्याकडे 3.96 कोटींची बेहिशेबी मालमत्ता असल्याचे सीबीआयने म्हटले आहे. उत्पन्नाच्या ज्ञात स्रोतापेक्षा 376 पटींनी ही मालमत्ता जास्त असल्याचा सीबीआयचा दावा आहे. पदाचा गैरवापर करून भ्रष्टाचार करीत त्यांनी ही मालमत्ता जमवली, असा सीबीआयचा आरोप आहे. केंद्रीय वस्तू व सेवा कर विभागाचे (सीजीएसटी) सहायक आयुक्त दीपक पंडीत यांच्यावर बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली. दीपक पंडीत यांच्याकडे चार कोटी रुपयांची बेहिशेबी मालमत्ता सापडली आहे. त्यांच्या उत्पन्नाच्या ज्ञान स्रोतांपेक्षा ही मालमत्ता 376 टक्क्यांनी जास्त आहे. या प्रकरणी सीबीआयने त्यांची पत्नी आणि दोन मुलांवरही कारवाई केली. दीपक पंडीत यांच्या नावावर मुंबईतील जुहू, अंधेरी आणि कांदिवली अशा महत्त्वाच्या ठिकाणी रहिवासी आणि व्यावसायिक स्वरुपाच्या मालमत्ता आहेत. या मालमत्ता घेण्यासाठी पैसा कसा उभारला याचा कोणताही अधिकृत पुरावा त्यांच्याकडे नाही. या प्रकरणी दाखल झालेल्या एका अज्ञात तक्रारीनंतर सीबीआयने ही कारवाई केली. सीबीआयने पंडीत यांची चौकशी सुरू केली आहे. दीपक पंडीत हे आधी सीमा शुल्क विभागात कार्यरत होते. 2000 ते 2014 या काळात सीमा शुल्क विभागात कार्यरत असतानाच त्यांनी ही संपत्ती जमविली असेल, असा सीबीआयच्या अधिकार्‍यांचा अंदाज आहे. दीपक पंडीत हे सीमा शुल्क विभागात मुंबईमध्ये वेगवेगळ्या पदांवर कार्यरत होते. त्यावेळीच त्यांनी ही माया जमविली असेल, असे सीबीआय अधिकार्‍यांचे म्हणणे आहे. दीपक पंडीत यांनी स्थावर आणि जंगम या दोन्ही स्वरुपाची मालमत्ता जमविली आहे. त्यापैकी काही मालमत्ता त्यांच्या नावावर तर काही मालमत्ता त्यांची पत्नी आणि मुलांच्या नावावर असल्याचे प्राथमिक तपासात दिसून आले. आरुषी पंडीत असे त्यांच्या पत्नीचे तर आशुतोष आणि दिव्यांश असे त्यांच्या मुलांची नावे आहेत. दीपक पंडीत यांनी आपल्या दोन्ही मुलांच्या लग्नामध्ये मोठा खर्च केला होता, असेही या प्रकरणी अज्ञात तक्रारदाराने म्हटले आहे.