Breaking News

निमोणच्या शेतकर्‍यांना अतिवृष्टीची नुकसान भरपाई 56 लाख 73 हजार रुपयांचा धनादेश प्रदान


संगमनेर/प्रतिनिधी ः
ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीतील नुकसानीचा मोबदला म्हणून निमोण येथील शेतकर्‍यांना 56 लाख 73 हजार रुपयांचा धनादेश देण्यात आला.
    854 शेतकर्‍यांना हा मोबदला मिळणार आहे. हा धनादेश थोरात कारखान्याचे संचालक इंद्रजित थोरात यांच्या हस्ते ग्रामस्थांना देण्यात आला.
बी. आर. चकोर, ज्ञानेश्‍वर सांगळे, साहेबराव आंधळे, डी. एम. घुगे, तुकाराम सांगळे, डॉ. शरद घुगे, सोमनाथ सांगळे, स्वप्नील लोंढे, पोपटराव घुगे, भास्कर कर्‍हाड, सागर मंडलिक, बाळनाथ घुगे यावेळी उपस्थित होते.
संगमनेर तालुक्यातील बर्‍याचशा गावांना दिवाळीच्या काळात अतिवृष्टीचा तडाखा बसला होता. यात शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले होते.
आमदार बाळासाहेब थोरात यांनी अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी केली होती. निमोण, पारेगाव, चिंचोली, देवकौठे, लोहारे, तळेगाव यासह विविध गावांना त्यांनी भेटी दिल्या होत्या. याप्रसंगी उपस्थित शासकीय कर्मचार्‍यांना तातडीने पंचनामे करून शेतकर्‍यांना जास्तीत जास्त मदत कशी मिळवून देता येईल यासाठी थोरात यांनी सूचना दिल्या होत्या. त्यानुसार निमोण गावातील 854 लाभार्थींना 56 लाख 73 हजार रुपयांचा धनादेश बुधवारी तहसील कार्यालयाच्या वतीने देण्यात आला. उर्वरित शेतकर्‍यांचे रकमेचे अनुदान टप्प्याटप्प्याने मिळणार आहे. या अनुदानाच्या पाठपुराव्याबद्दल व मिळालेल्या रकमेबाबत शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे.