Breaking News

दिल्लीत केजरीवालांची लाट कायम ; भाजपला धोबीपछाड आप 67 तर भाजप 7 जागांवर विजयी काँगे्रसला भोपळा


नवी दिल्ली ः दिल्लीमध्ये पुन्हा एकदा आम आदमी पक्षाने आपले वर्चस्व राखत भाजपला चांगलीच छोबीपछाड दिली आहे. सत्तेत असलेल्या आम आदमी पार्टीला स्पष्ट बहुमत देत दिल्लीकरांनी सत्तेवर बसण्याचा कौल दिल्याचे स्पष्ट झाले आहे. आम आदमी पक्षाने 63 जागांवर विजय मिळविला असून भाजपने 7 जागा जिकंल्या आहेत. तर दुसरीकडे काँगे्रसचा एकही उमेदवार निवडून आलेला नाही.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली लढणार्‍या भाजपानं ही निवडणूक प्रचंड प्रतिष्ठेची केली होती. राष्ट्रावाद विरूद्ध विकास अशी एकदरीत ही निवडणूक लढवली गेली. त्यात दिल्लीकरांनी विकासाला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे अरविंद केजरीवाल सलग तिसर्‍यांदा दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान होतील. यासर्वांमध्ये काँग्रेसची कामगिरी निराशाजनक राहिली आहे. दिल्लीचे उपमुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे नेते मनीष सिसोदिया यांनी पटपडगंज विधानसभा मतदार संघातून विजय मिळविला आहे. या विधानसभा निवडणुकीत मनीष सिसोदिया यांनी भाजपाचे उमेदवार रविंदर सिंह नेगी यांचा पराभव केला. विजयी झाल्यानंतर मनीष सिसोदिया यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी भाजपावर निशाणा साधला. मनीष सिसोदिया म्हणाले, पुन्हा एकदा पटपडगंड विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आल्यामुळे खूप आनंदी आहे. भाजपाने द्वेषाचे राजकारण करण्याचा प्रयत्न केला. मात्र, दिल्लीतील लोकांनी असे सरकार निवडले की, जे लोकांसाठी काम करत आहे. याचबरोबर, हा पटपडगंजच्या जनतेचा विजय आहे. अनेक जागांवर वेगवेगळ्या लढती झाल्या होत्या. जनतेने भाजपच्या या द्वेषाच्या राजकारणाला नकार दिला, असेही मनीष सिसिदिया यांनी सांगितले. मतमोजणीपूर्वीच भाजपचे दिल्ली अध्यक्ष आणि खासदार मनोज तिवारी यांनी विजयाचा दावा केला होता. पण भाजप कार्यालयात लागलेल्या पोस्टर्समुळे भाजपने अगोदरच पराभव तर मान्य केला नाही ना, अशीही शंका उपस्थित केली जात आहे. विजयाने आम्ही अहंकारी होत नाही, पराभवाने खचून जात नाही, अशा आशयाचे पोस्टर्स लावण्यात आले आहेत. सर्वच एक्झिट पोलच्या सर्व्हेनुसार दिल्लीत पुन्हा एकदा मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील आम आदमी पक्षाचं सरकार येणार आहे. सर्वच एक्झिट पोलमध्ये ’आप’ला बहुमत मिळताना दाखवले आहे. भाजपला मोठा फटका बसणार असून त्यांना अपेक्षित जागाही मिळताना दिसत नाहीत. तसेच काँग्रसेचं दिल्लीत पुन्हा पानीपत होताना या एक्झिट पोलमधून दिसत आहे.दिल्लीतील तीन महापालिका आणि 7 लोकसभा मतदारसंघातही भाजपचं वर्चस्व आहे. पण विधानसभेवर झेंडा फडकवण्याचे भाजपचे स्वप्न यावेळीही अपूर्ण राहण्याची चिन्हे आहेत. भाजपने दिल्लीत अखेरचा विजय पहिल्या विधानसभा निवडणुकीत म्हणजे 1993 ला मिळवला होता. या एकाच टर्ममध्ये भाजपने मदन लाल खुराना, साहिब सिंग वर्मा आणि सुषमा स्वराज हे तीन मुख्यमंत्री दिले होते.