Breaking News

शेवगाव येथे दिव्यांगांसाठी रेशन कार्ड मेळावा 81 अर्ज दाखल


शेवगाव/ प्रतिनिधी ः
दिव्यांगांसाठी शेवगाव येेथे पिवळे रेशन कार्ड अर्ज मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
  सावली दिव्यांग कल्याणकारी बहुउद्देशीय संस्थेचे राज्य अध्यक्ष बाबासाहेब महापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली व उपाध्यक्ष चांद शेख यांच्या नेतृत्वात या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी 81 दिव्यांग बांधवांचे पिवळ्या रेशनकार्डसाठी अर्ज दाखल करुन घेण्यात आले.
सावली दिव्यांग संस्थेचे चांद शेख, संभाजी गुठे, नवनाथ औटी, गणेश महाजन, सुनील वाळके, अशोक कुसळकर, गोविंद बाहेती, विजू आंधळे, राधाकिसन चेमटे, भाऊसाहेब गव्हाणे, खलील शेख, मनोहर मराठे, प्रदीप मराठे, ताराचंद पिवळ, नरहरी बर्डे, शिवाजी आहेर, मनोज गोर्डे, भरत साळुंके, महेबूब शेख, एकनाथ धाने, अशा काळे, तारामती घानमोडे, सकू मिसाळ, वंदना तुजारे, सोनाली चेडे, जयश्री अंधारे, सावली दिव्यांग संस्थेचे पदाधिकारी व दिव्यांग बांधव यावेळी उपस्थित होते.दिव्यांगांना पिवळे रेशनकार्ड देण्यासाठी तहसीलदार, नायब तहसीलदार मयूर बेरड, पुरवठा निरीक्षक चिंतामणी, बहुरे, तहसीलचे अधिकारी, कर्मचारी तसेच मीना कळकुंबे यांचे सहकार्य मिळणार आहे. सावली दिव्यांग कल्याणकारी बहुउद्देशीय संस्थेचे उपाध्यक्ष यांनी सर्व अधिकारी यांचे आभार मानले. पिवळी शिधापत्रिका मिळणार असल्याने सर्व दिव्यांगांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.