Breaking News

करोनामुळे एकाच दिवसात 97 जणांचा मृत्यू

बीजिंग: चीनमध्ये करोना व्हायरसचा धोका दिवसेंदिवस वाढत असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. करोनामुळे मृत्यूमुखी पडणार्‍या नागरिकांच्या संख्येत वाढ होत आहे. रविवारी एकाच दिवशी तब्बल 97 जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. यातील सर्वाधिक 91 जणांचा मृत्यू वुहान प्रातांत झाला आहे. चीनमध्ये करोना व्हायरसचा संसर्ग झाल्याची आणखी 4008 नवीन प्रकरणे समोर आली.