Breaking News

कांदा व्यापार्‍याला सव्वा कोटींचा गंडा उत्तरप्रदेशमधील दोघांनी केली फसवणूक


संगमनेर/प्रतिनिधी ः
तालुक्यातील खांजापूर सुकेवाडी येथील कांदा व्यापार्‍याला परप्रांतीयांनी एक कोटी 33 लाख रुपयांना गंडा घातला. अमन राजपूत व मनमोहन राजपूत ललई (राहणार खैरगड, फिरोजाबाद, उत्तरप्रदेश) अशी फसवणूक करणार्‍यांची नावे आहेत.
महिन्याभरापूर्वी बाजारात कांद्याचे भाव तेजीत असताना अमन आणि मनमोहन राजपूत यांनी सातपुते यांच्याकडून कांदा खरेदी केला होता. त्याचा मोबदला म्हणून व्यापार्‍यांनी एक कोटी 33 लाख रुपयांचा धनादेश सातपुते यांना दिला. परंतु व्यापार्‍यांनी दिलेला धनादेश बँकेत वटला नाही. त्यामुळे सातपुते यांनी दोनही व्यापार्‍यांना फोनवरून संपर्क करण्याचा प्रयत्न केला. परंतु या दोघांनी फोन बंद केल्याचे त्यांच्या लक्षात आले.
यामुळे आपली फसवणूक झाल्याचे सातपुते यांना लक्षात आले. त्यांनी ताबडतोब संगमनेर शहर पोलिसांना झालेल्या प्रकारची माहिती दिली. संगमनेर शहर पोलिस ठाण्यात दोनही आरोपींविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस निरीक्षक अभय परमार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक माळी करत आहेत. कधी नव्हे ते कांद्याच्या बाजारभावात तेजी आल्याने अतिवृष्टी आणि दुष्काळाने हैराण झालेल्या शेतकर्‍यांना चांगला भाव मिळत होता. त्या आशेवर कांदा विक्री केलेल्या कांदा व्यापार्‍याला परप्रांतीयांनी गंडा घातला.