Breaking News

भारतीय संविधानाने महिलांना काय दिले?

भारतीय संविधानाने महिलांना काय दिले याची जाणीव खुप कमी महिलांना आहे. शिकलेल्या सवरलेल्या महिला भरगच्च पगार घेतात. घरात कपाटे भरून साड्या, वरून चांगले दिसण्यासाठी हजारो रुपयांचे श्रुगांरीक साहित्य घरामध्ये सापडते परंतू ज्याचा हे वैभव आपल्याला मिळाले ते संविधान घरात सापडत नाही ही शोकांतीका आहे. आज जो महिलांचा साज आहे तो फक्त आणि फक्त संविधानामुळेच. भारतीय स्त्रीला वर बघण्याचा अधिकार सुद्धा नव्हता. भारतीय स्त्रिला फक्त उपभोगाच साधन, पायातील वहान, घरातील दासी म्हणून ओळख होती परंतु संविधानाच्या जोरावर राष्ट्रपती, प्रधानमंत्री, खासदार , आमदार व स्थानिक स्वराज्य संध्येत महत्त्वाचे पद तर प्रशासकीय सेवेमध्ये अती महत्त्वाचे पद स्रियांना मिळाले. एवढी भरभराट करणार्‍या संविधानाला महिलांनी अजून घरात आणले नाही यावरून महिला आजही संविधानाला बेईमान आहेत. महिलांनी विषेशत ः ओबीसी महिलांनी संविधान घरात आणून स्वतः वाचणे आवश्यक आहे, स्वतः वाचले तुम्ही तुमच्या मुलांना सांगणार, मुलाला संविधान समजले तर मुलगा सर्वोच्च न्यायालयात न्यायधिश होईल.
 घरात संविधान नसल्याने ओबीसी बांधवांचे अतोनात नुसकान झाले आहे याची जाणीव ओबीसी बांधवांना आज राहली नाही. महिला आज शिकल्या अक्षर ओळख महिलांना झाली अक्षर ओळखता येऊ लागले पण अक्षराचा अर्थ त्यांना अजूनही कळाला नाही म्हणून तर आजही महिलांना संविधान कळाले नाही. थोडक्यात आज पुस्तकाने साक्षर झालेले आज मस्तकांने निरिक्षर आहेत. जोपर्यंत मस्तक साक्षर होणार नाही तोपर्यंत मानवाचा विकास होणे शक्य नाही. भारत ब्रिटीशांच्या गुलामीत होता आणि भारतीय समाज धर्म ग्रंथ व अनिष्ट रूढी परंपरा यांच्या गुलामीत होता व स्त्रि धार्मिक ग्रंथ व अनिष्ट रूढी परंपरे बरोबरच माणसाच्या गुलामीत होती याची जाणीव खरंच कीती स्त्रियांना आहे? हजारो वर्षाची महिलांवर असलेली गुलामी तोडून महिलांना महिलांचे अस्तित्व निर्माण करून देणारे एकमेव म्हणजे भारतीय संविधान होय. आज संविधान साक्षर होणे काळाची गरज आहे. महिलांचे अस्तित्व तर संविधानाने निर्माण करून दिले परंतू ते चिरकाल अबाधित राहिल याची खबरदारी सुद्धा आपल्या भारतीय संविधानाने घेतलेली आहे. कलम क्रमांक 14 असे सांगते कायद्यापुढे सगळे समान आहेत. लिंग, वर्ण, जात, धर्म या आधारावर आपल्याला विषमता करता येत नाही. हजारो वर्षापासून गुलामीत खितपत पडलेल्या महिलांमध्ये उर्जा भरून उभे राहण्याची ताकद कलम क्रमांक 14 दिली. पुर्वी महिलांची एकही गोष्ट ऐकून न घेता फक्त महिलांचा छळ व्हायचा, आई सुद्धा सांगायची मुलीचा जन्म संघर्षासाठी असतो म्हणून मुलीला सुद्धा कधी स्वातंत्र्याची गरज भासली नाही. संविधानामुळे स्त्रीला स्वतः ची बाजु मांडण्याची संधी प्राप्त झाली आणि कालपर्यंत खाली मान घालून जगणारी स्त्री आज सन्मानान वागु लागली हे फक्त संविधानाची देण होय. कलम क्रमांक 15 (1) असे सांगते की लिंग, जात, धर्म यावर आधारित कोणताही भेदभाव केल्या जाणार नाही. भेदभाव हा महिलांना नवीन नाही. जेथे महिलांच्या जन्मा पासुन तर मरे पर्यंत सगळे आयुष्य भेदभावात जाते तेथे महिलांना भेदभाव जास्त समजून सांगण्याची गरज नाही असे वैयक्तिक मत असले तरी मुलगी जन्माला आली की जिलेबी वाटण्या पासून मुलीने घरात माणसाचे जेवण झाल्यावर जेवावे ईथपर्यंथ फक्त भेदच दिसून येतो. महिलांनी मंदीरात जाऊ नये, महिलांनी जोरात बोलु नये, महिलांनी पुरूषांसमोर बसु नये. अशा एक ना अनेक प्रकारचे भेद महिलांसोबत भारतीय व्यवस्था करत आली आहे आणि अजूनही काही ठिकाणी चालु आहे. परंतु संविधान म्हणते महिला आहे म्हणून तिला आपण दुय्यम, खालच्या दर्जाची वागणूक देऊ शकत नाही तर महिलांना एक व्यक्ती म्हणून तिचा स्विकार करावा. महिला चंचळ असते, तिला नियंत्रणात ठेवले पाहिजे, महिलेला पुरूषांच्या डाव्या बाजूला बसवले पाहिजे अशी शिकवण धर्म ग्रंथांची असताना संविधानाने स्त्रिला समान स्थान देऊन जिवन जगण्याची शक्ती निर्माण करुन दिली. महिला किती ही हुशार असली, कलागुण संपन्न असली तरी तीच्या डोक्यावरचा पदर खाली पडला तर धर्म बुढायचा. चौकट ओलांडण्याची मुभा नसलेल्या महिलांना विदेश वारी घडवून आणली ती संविधानाच्या कलम क्रमांक 16 ने. कलम क्रमांक 16 नुसार कोणताही भेदभाव न करता प्रत्येकाला संधी उपलब्ध आहे. एखाद्या संधीचा फायदा केवळ स्त्रि आहे म्हणून कोणालाच नाकारता येत नाही. प्रत्येक क्षेत्रात आज महिला यशस्वी होण्याचे कारण कलम क्रमांक 16 होय. घरात बाजार आणण्याची परवानगी नसलेली महिला आज चंद्रावर जात आहे, प्रशासकीय सेवेत आहे. क्रिडा नृत्य यामध्ये अग्रेसर होऊन नाव लौकिक मिळवत आहेत हे फक्त आणी फक्त कलम क्रमांक 16 मुळे. गुलामीत खितपत पडलेल्या स्रियांना भारतीय संविधान आदर्श व भौतिक जिवन जगण्यासाठी संजिवनीच आहे. परंतु आजही महिलांना संविधानाने स्वातंत्र्य दिले, त्या स्वातंत्र्याचा उपभोग घेत आहेत परंतु संविधाना विषयी महिलांना थोडीही आत्मियता नाही यावरून महिला आजही संविधाना ला बेईमान आहेत. महिलांची एक शिकवण आहे ज्यांच खावे मिठ त्यांचे काम करावे निट. परंतु महिला संविधानाचे काम करत नाही याचा अर्थ एक तर त्यांना संविधान कळाले नाही, किंवा त्यांनी संविधान समजून कधी घेतले नाही. दासी म्हणून राबराब राबणारी रात्री उशिरा झोपुन सकाळी लवकर उठणार्‍या महिलांच्या कामाला समाजाने व धर्मग्रंथाने शुन्य किंमत दिली असताना भारतीय संविधानाने मात्र महिलांच्या कामाचा सन्मान करून समान काम समान वेतन दिले. कलम क्रमांक 39 (ड) नुसार स्त्रि आणि पुरुष एकच काम करत असतील तर त्यांना समान वेतन देण्यात यावे. म्हणजे एखादी स्त्रि शिक्षीका असेल, कलेक्टर असेल तर तिला त्याच पदानुसार पगार दिला जातो महिला आहे म्हणून कमी पगार दिला जात नाही. घरात सगळे जेऊन शिल्लक राहिलेल्या अन्नावर दिवस काढणारी महिला आज घरात सगळ्यात जास्त कमावते हे फक्त संविधानामुळेच. महिला आजारी असो वा थकलेली असो तिला घरातील सांगितलेली सगळी कामे अगदी निमुटपणे करावी लागतात. तिच्या दु:खाचा कुणीच विचार करत नाही. परंतु संविधानाने महिलांचा विचार करून महिलांना सक्षम करण्याची योजना आखली आहे. घरात बाळांतीन झालेल्या महिलेला आठ दिवसांत कामाला लावणारा भारतीय समाज होता. थोडा ही आराम महिलेच्या जिवाला नसताना. संविधानाने गर्भवती महिलेला सहा महिण्याची पगारी सुट्टी देऊन महिले सोबतच देशाच्या भविष्याला सुद्धा मजबूत करण्याची संधी उपलब्ध करून दिली. घरात स्वयंपाक केला नाही तर पोटाला खायला मिळत नाही परंतु सहा महिने घरी बसुन पगार फक्त संविधानामुळेच मिळतो हि बाब महिलांनी विसरता कामा नये. भारतीय संविधानाने महिलांचे जिवनच बदलून टाकले. महिलांच्या जिवनात आनंद, सुख, वैभव देऊन महिलांचे जिवन मोकळे करून टाकले. परंतु खंत याची आहे की संविधानाने महिलांना मालामाल करून दिले, स्वतः चे स्थान व कायमस्वरुपी ओळख निर्माण करून दिली. पण महिलांनी संविधानासाठी काय केले? आम्ही संविधान बदलण्यासाठी सत्तेत आलोय असे भुकंणारे अनेक आहेत. संविधाना बदलण्याची भाषा करणारे लोक येथे असताना संविधाना विषयी एक जरी अपशब्द काढला तर त्याची नांगी ठेचणारी महिला तयार झाली नाही. दिल्लीला संविधान जाळते जाते तेव्हा अपवाद वगळता महिलांना काहीच वाटत नाही तेव्हा महिलांच्या बुद्धीची किव येते. बलात्कारी आसारामला शिक्षा होऊ नाही म्हणून रस्त्यावर येणार्‍या महिला, रस्त्यावर येण्याचा अधिकार देणारे संविधान जाळले जाते तेव्हा कुठे बसतात हा देखिल संशोधनाचा विषय आहे. आपले वैभव आणि अस्तित्व अबाधित ठेवायचे असेल तळ अगोदर महिलांनी आपले अस्तित्व व स्थान कोणामुळे निर्माण आहे त्याचा अभ्यास करावा. ते समजून घ्यावे तरच उद्याची पहाट हि महिलांच्या आनंदीमय, व वैभवशाली जिवनाची असेल. आज जर संविधान महिलांनी वाचले नाही तर उद्याचा काळ खुप वाईट आहे. आज संविधान असताना महिलांना भर दिवसा जाळले जाते, भोगलं जाते, कापलं जाते, जर उद्या संविधान नसेल तर महिलांची गुलाम गिरी कल्पना शक्तीच्या पलिकडची असेल म्हणुन महिलांनी संविधान साक्षर होऊन शंभर टक्के संविधान लागु करण्याचा अट्टाहास धरला तर उद्याची कळी फुलेल. संविधान विरोधी लोक तर उद्या आनंदाची कळीच फुलणार नाही याची सर्वतोपरी काळजी घेत असताना महिला मात्र साडी, माडी, गाडी, आणि टिव्हितच मग्न आहे. आज संविधानाविषयी अज्ञान असेल तर उद्या आपला अंत नक्कीच वाईट आहे. आपल्याला टिव्ही बघुन जिवन नष्ट करायचे कि संविधान वाचुन जिवन श्रेष्ठ करायचे हे महिलांनी ठरवावे.
विनोद सदावर्ते
मो. 9130979300