Balasaheb shete / mo . 7028351747 ऑनलाईन दरोड्याविषयी ' दैनिक लोकमंथन ' ने कालच प्रकाशझोत टाकला होता . पूर्वीच्या दरोड्य...
Balasaheb shete / mo . 7028351747
ऑनलाईन दरोड्याविषयी 'दैनिक लोकमंथन'ने
कालच प्रकाशझोत टाकला
होता. पूर्वीच्या दरोड्याची
पद्धत आणि दरोडा
टाकण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या साहत्याची
उदाहरणार्थ कुऱ्हाडी, काठ्या, मिरची
पूड आदींची या
अनुषंगाने कालच्या लेखात चर्चा
करण्यात आली. मात्र
अहमदनगर शहराच्या माळीवाडा भागातील
गोंधळेगल्ली पारिसरात एका भामट्याने
चक्क महापालिका कार्यालयातून
आलो, असे सांगून
येथील एका महिलेला
३० हजार रुपयांचा
गंडा घातला. काय
हिमंत आणि काय
धाडस म्हणावे लागेल
त्या भामट्याकडे, दिवसाढवळ्या
त्याने केलेली ही कल्पक
चोरी पोलिसांच्या डोळ्यात
झणझणीत अंजन घालणारी
आहे.
चोरी करण्याची पद्धत क्षणोक्षणी
बदलण्यालाच कदाचित 'पोलिसांच्या डोळ्यात
धूळफेक करणं' असे मानले
जात असावे. माळीवाड्यातील
गोंधळेगल्ली परिसरात घरी एकट्या
असलेल्या महिलेला पाहून या
भामट्याने मोठा हात
मारला. त्याने असा बनाव
केला, की त्या
महिलेचा नाविलाज झाला आणि
तिने अंगावरचे तीस
हजार रुपये किमतीचे
दागिने हातोहात नेले. तो
भामटा महिलेला म्हणाला,
'मी महानगरपालिकेतून आलो
आहे, तुमच्या भायाच्या
अर्थात पतीच्या मोठ्या भावाच्या
नावावर घरकुल मंजूर झाले
आहे. त्यासाठी अडीच
लाख रुपयांचा हा
चेक त्यांच्या बँक
खात्यात भरून तो
तुम्हाला वटविता येणार आहे.
त्यासाठी तुम्ही तुमच्याकडील सोन्याची
वस्तू द्या, असे
म्हणत त्या भामट्याने
सदर महिलेच्या गळ्यातील
अंदाजे ३० हजार
रुपये किंमतीचे एक
तोळे सोन्याचे गंठण
घेऊन पोबारा केला.
सदर महिला भांबावून
गेल्याने त्या भामट्याच्या
शब्दजंजाळात फसली. अशावेळी काय
होते, कोणास ठाऊक,
मात्र माणसाला एकप्रकारची
भुरळच पडते. त्यात
महिलांचा स्वभावच मुळात मायाळूआणि
साधा सरळ असतो.
त्यामुळे त्यांची सहज फसवणूक
करता येते, हे
तंत्र या भामट्यांना
चांगल्याप्रकारे अवगत झाले
आहे. विशेष म्हणजे
असे फसवणुकीचे अनेक
प्रकार वर्तमानपत्रात वेळोवेळी छापून येतात.
मात्र यातून कोणीच
बोध घेत नाही,
असंच या प्रसंगावरून
स्पष्ट होते. या महिलेने
सदर भामट्याला विचारायला
हवे होते, की
बाबा रे तू
महापालिकेतून आला, हे
ठीक आहे, पण
तुला कोणत्या साहेबांनी
पाठवलंय, जरा त्यांचा
मोबाईल नंबर देतोस
का, मी चौकशी
करते, माझ्या कोणत्या
भायाने घरकुलासाठी अर्ज केला
होता? विशेष म्हणजे
घरकुलांची प्रकरणे प्रामुख्याने झोपडपट्टी
परिसरात आणि ग्रामीण
भागातील आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या भागांत
मंजूर केली जातात,
माळीवाडा हा तसा
श्रीमंत आणि उच्चभ्रू
लोकांचा परिसर असून या
भागात घरकुल योजनेची
प्रकरणे कधी करण्यात
आली होती, हा
मोठा घन प्रश्न
आहे. मात्र या
आणि सर्वच महिलांनी
अनोळखी इसम काय
बोलतो, काय सांगतो,
त्याची नजर कशी
आहे, तो जे
बोलतो, त्याची खात्री यापुढे
नक्कीच करावी. एक मात्र
नक्की, की चोरी
करण्यासाठी फक्त रात्रच
असावी लागते, हे
जरुरी नसून दिवसाढवळ्या
चोरी करता येते,
हेच या घटनेवरून
स्पष्ट होते. शेवटी 'दुनिया
झुकती हैं, झुकानेवाला
चाहिए' हेच खरं.
नाही का?
'सोन्याला पॉलिश'नंतरचा फंडा!
चोरट्यांची
चोरी करण्याची 'मोडस
ऑपरेंटी' कधी बदलेल,
याचा काहीही नेम
राहिलेला नाही. पूर्वी 'बायांनो!
नवरे सांभाळा' या
नावाने चित्रपट आला होता,
आता 'बायांनो दागिने
सांभाळा!' कदाचित असा चित्रपट
काढावा लागेल. फार पूर्वी
म्हणजे चार सहा
महिन्यांपूर्वी शहरासह ग्रामीण भागांत
भुरट्या चोऱ्या करणाऱ्या चोरटयांनी
एक नामी शक्कल
शोधून काढली होती.
घरी एकट्या असलेल्या
महिला असल्याचे हेरून
दाट आणि न
उमजेल असे काही
तरी कोड्यात बोलून
हे भामटे सोन्याच्या
दागिन्यांना पॉलिश करण्याच्या बहाण्याने
सदर महिलेच्या गळ्यातील
सर्व सोने घेऊन
पोबारा करत असत.
मात्र या प्रकरणानंतर
हा नवीनच फंडा
या चोरटयांनी आणलाय.