Breaking News

फरार नीरव मोदीच्या संपत्तीचा लिलाव


मुंबई : पंजाब नॅशनल बँक घोटाळा प्रकरणातील फरार आरोपी हिरे व्यापारी नीरव मोदी याच्या जप्त मालमत्तांचा गुरुवारी ई लिलाव होणार आहे. दोन टप्प्यात नीरव मोदींच्या मालमत्तांचा लिलाव होणार आहे. यात महागडी चित्रे, आलिशान मोटारी, सोने आणि हिर्‍यांनी मढवलेली डझनभर महागडी घड्याळे यांची विक्री केली जाणार आहे. पंजाब नॅशनल बँक घोटाळा प्रकरणात नीरव मोदी याला विशेष पीएमएलए न्यायालयानं यापूर्वीच परागंदा आर्थिक गुन्हेगार म्हणून घोषित केले आहे.