Breaking News

'संबोधि'मध्ये गायकवाड स्मृतिदिन उत्साहात


अहमदनगर / प्रतिनिधी
फुले -शाहू -आंबेडकर चळवळी मधील ज्येष्ठ नेते, रिपब्लिकन चलवळीतील झुंजार नेते, दलित मुक्तीसेनेचे तत्कालीन जिल्हाध्यक्ष कालकथित भैय्यासाहेब गायकवाड़ यांचा २१ वा स्मृतिदिन संबोधी विद्यार्थी वसतिगृह येथे वस्तीगृहातील विद्यार्थी, भिमा गौतमी वस्तीगृहातील विद्यार्थिनी तसेच जिजामाता कन्या निवास येथील विद्यार्थ्यांना अन्नदानाणे साजरा करण्यात आला.
यावेळी रिपब्लिकन नेते अशोकराव गायकवाड़, माजी नगरसेवक अजय साळवे यांनी कालकथित गायकवाड यांच्या स्मृतींना उजाळा दिला. यावेळी रविंद्र कांबळे, विठ्ठल प्रसाद तिवारी, दिलीप पाचारने, उपप्राचार्य शिंदे, प्रा. पगारे, प्रा. वाघमारे, दिपक गायकवाड़, मैत्री प्रतिष्ठानचे शाम कांबळे, चाबुकस्वार, भिमा जाधव, नितिन कसबेकर, नितिन साळवे, महेश भोसले, सारंग पाटेकर, पाखरे, अजय भिंगारदिवे, ससाने, तपासे आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन विनय गायकवाड़, प्रा.जयंत गायकवाड़, सुमेध गायकवाड़, प्रा. कृष्णा साबळे, सिद्धांत गायकवाड़, संघराज गायकवाड़, धम्मराज गायकवाड़ आणि गायकवाड़ परिवारातील सदस्यांनी केले होते.