Breaking News

रांजणखळगे पर्यटन क्षेत्राचा कायापालट करणार:आ.लंके निघोज/प्रतिनिधी
 लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेली निघोजची मळगंगा माता परिसर, जगप्रसिद्ध रांजणखळगे कुंडपर्यटन क्षेत्राचा कायापालट करणार आहे. या परिसराचा भाविकांना व पर्यटकांना हेवा वाटावा यासाठी राज्याच्या पर्यटन योजना विकास निधी, आमदार निधीमधून जास्तीत जास्त निधी आणून येथे विकास कामे करणार असून कुंडपर्यटन क्षेत्राची जागतिक पातळीवर एक वेगळीओळख निर्माण करणार असल्याचे प्रतिपादन आमदार नीलेश लंके यांनी केले.
 आ. लंके यांनी निघोज येथिल जगप्रसिद्ध रांजणखळगे कुंडपर्यटन क्षेत्राच्या विकासकामांची पाहणी केली यावेळी ते बोलत होते. जागतिक दर्जाच्या कुंडपर्यटन क्षेत्राच्या विकासकामांसाठी २०२० -२०२१ चा आराखडा (मास्टर प्लॅन), त्यामध्ये क्षेत्र कुंड येथील पर्यटक विसावा केंद्र, भाविक, पर्यटकासाठी प्रसादालय, लहान मुलांसाठी बोटींग प्रकल्प, भव्य गार्डन, नाना नानी पार्क, गट नंबर ६७ व २४३९ ला वॉल कंपाऊड, मंदिरासमोर काँक्रीट रस्ता, कुंड रस्ता ते शिरुर (जि.पुणे) रस्ता, बायपास काँक्रीट रस्ता, अंतर्गत गटार येजना, वाहन पार्कीगं व्यवस्था आदींच्या विकासकामांची चर्चा यावेळी आ. लंके यांनी केली. हा आराखडा पर्यटन खात्याकडे पाठवून निधीचा प्रश्न तत्काळ मार्गी लावणार असल्याचे आ. लंके यांनी सांगितले.
 यावेळी मळगंगा ट्रस्टचे कार्यउपाध्यक्ष व कन्हैया उद्योग समूहाचे अध्यक्ष शांताराम लंके, सचिव शांताराम कळसकर, सरपंच ठकाराम लंके यांनी आमदार नीलेश लंके, आर्कीटेक एस.कुंजीर, प्रमोद मोहीते यांना संपूर्ण विकास कामांच्या आराखडयांची माहीती दिली. यावेळी सहसचिव रामदास वरखडे, विश्वस्त वसंत कवाद , बाळासाहेब लामखडे, शंकर लामखडे, काळूराम गजरे, वसंत ढवण, विश्वास शेटे, ट्रस्टचे व्यवस्थापक महेश ढवळे, दिलीप कवाद, संदिप वराळ, रोहीदास वराळ आदी मान्यवर उपस्थित होते.