Breaking News

अजून मैदान सोडलेले नाही माजी आमदार औटी यांचे प्रतिपादन


कान्हूर पठार/प्रतिनिधी ः
विकासाच्या माध्यमातून मतदारसंघाचा चेहरा बदलला आहे. सध्या आमदार नसलो तरी अजून मैदान सोडलेले नाही, असे प्रतिपादन माजी आमदार विजय औटी यांनी केले.
       पारनेर तालुक्यातील अळकुटी येथे महादेव मंदिराच्या सभामंडपाचे उद्घाटन झाले. त्यावेळी औटी बोलत होते. जिल्हा परिषद बांधकाम सभापतीपदी निवड झालेले काशिनाथ दाते, पंचायत समिती सभापतीपदी निवड झालेले गणेश शेळके यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. अध्यक्षस्थानी जिल्हा शिवसेना उपप्रमुख रामदास भोसले होते. शिवसेना उपतालुकाप्रमुख संतोष येवले, तालुका शहर प्रमुख नीलेश खोडदे, युवा सेना उपप्रमुख ताराचंद गाजरे, विभाग प्रमुख सखाराम उचघरे, उपससरपंच मधुकर जाधव, तंटामुक्ती अध्यक्ष नामदेव घोलप, ग्रामपंचायत सदस्य शरद घोलप, आरिफ पटेल, सुभाष पुंडे, अश्‍विनी परंडवाल, बाळासाहेब धोत्रे, संजय ठुबे, म्हस्केवाडीचे सरपंच डॉ. किरण पानमंद, हरिओम परंडवाल, संपत जाधव, बाळासाहेब ठुबे, गणपत माने, बापू माने, नारायण माने, श्रीपाद शिरोळे, अरुण परंडवाल, दत्तात्रय क्षीरसागर, अशोक शिरोळे , भरत खामकर, सुभाष औटी, कैलास शिंदे, गणेश घोलप, गौतम घोलप, प्रशांत घोलप, बाबाजी शिंदे, शशिकांत शिंदे, बापू जाधव, धनाजी जाधव, गोरख कनिंगध्वज, विश्‍वनाथ झिंझाड, निवृत्ती चौधरी आदी यावेळी उपस्थित होते.
औटी म्हणाले, कार्यकर्त्यांनी खचून जाण्याचे कारण नाही. विकासकामासाठी मी सदैव तुमच्या पाठीशी आहे. सभापती दाते व शेळके यांनी जास्तीत जास्त विकासकामे करुन कार्यकर्त्यांना पाठबळ द्यावे, असेही ते म्हणाले.
   काशिनाथ दाते म्हणाले, सर्वांना न्याय देण्याचा प्रयत्न केला जाईल. औटी साहेबांच्या माध्यमातून अनेक विकासकामे होणार आहेत. माझ्या पदाचा वापर मी जनतेच्या कामासाठीच करेल, असेही आश्‍वासन त्यांनी दिले.
    पंचायत समिती सभापती गणेश शेळके म्हणाले, पंचायत समितीच्या माध्यमातून गरजू व्यक्तींना योग्य ते सहकार्य करुन त्यांची कामे करु. कार्यकर्त्यांना नेहमीच पाठबळ दिले जाईल. जिल्हा शिवसेना उपप्रमुख भोसले म्हणाले, औटी यांनी जलसंधारणाच्या माध्यमातून अनेक गावांचा पाण्याचा प्रश्‍न सोडवला आहे. रस्ते, सभामंडप, विविध योजनांच्या माध्यमातून विकासकामांच्या माध्यमातून त्यांनी वेगळी ओळख निर्माण केली आहे.