Breaking News

भिंगारवासियांना आठ दिवसांत मिळणार डस्टबिन!


भिंगार : 
शहरातील प्रत्येक घरातील घनकचरा आणि ओला कचरा साठवून ठेवण्याकरता कॅन्टोन्मेंट बोर्डाकडून पुरविण्यात येणाऱ्या डस्टबिन  वाटपासंदर्भात मध्यंतरी बरीच ओरड झाली होती. एका राजकीय पक्षाच्या नेत्याने डस्टबिन  वाटप घोटाळा   डस्टबिनचे वाटप भिंगार मधील नागरिकांना झाले नसून त्याची चौकशी करण्याची मागणीही कॅन्टोनमेंट बोर्डाकडे करण्यात आली होती. दरम्यान, त्याबद्दलचा खुलासा कॅंटोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी विद्याधर पवार यांनी नुकताच केला आहे. येत्या आठ दिवसांत डस्टबिनचे वाटप होणार असल्याचे त्यांनी सांगितले.   
दरम्यान, भिंगारमधील काही नागरिकांना दोन डस्टबिन, काही नागरिकांना एक डस्टबिन तर काही नागरिकांना एकही डस्टबिन मिळाली नाही. त्यामुळे  भिंगारमधील नागरिकांमध्ये याविषयी उलट सुलट चर्चा ऐकायला मिळाल्या. घरातील कचरा साठवून ठेवण्याकरता डस्टबिन नसल्यामुळे तो कचरा इतरत्र टाकण्यात येतो. त्यामुळे शहरांमध्ये अस्वच्छता पसरत असून स्वच्छतेसाठी  कचरा साठवून ठेवण्यासाठी डस्टबिनची मागणी भिंगारकर नागरिक करीत आहेत. डस्टबिन मिळाल्यास तो कचरा साठवून  घंटागाडी मध्ये टाकण्यास मदत होऊन स्वच्छतेबाबतीत कॅन्टोनमेंट बोर्डास नागरिकांचा सहभाग होईल.
भिंगार शहरातील स्वच्छते बाबतीत भिंगार कॅन्टोन्मेंट बोर्डाकडून स्वच्छ भारत अभियान  मोहिमेच्या अंतर्गत  भिंगार मधील  नागरिकांना घरातील  कचरा इतरत्र टाकता तो  घरातील कचरा डस्टबीन मध्ये साठवून तो कचरा गल्लोगल्ली फिरणाऱ्या घंटागाडीत टाकण्यासाठी डस्टबिनचे वाटप नागरिकांना करण्याचे ठरले होते. तसा ठराव कॅन्टोन्मेंट  बोर्ड मीटिंगमध्ये होऊन प्रत्येक घरटी दोन डस्टबिनचे वाटप करून एक डस्टबिनमधे  ओला कचरा दुसरा डस्टबिनमधे सुका कचरा साठवण्यासाठी प्रत्येकी दोन डस्टबिनचे वाटप करण्याचे ठरविले होते. त्याप्रमाणे पुरवठा दाराकडे मागणीही करण्यात  आली होती. मागणी केल्याप्रमाणे डस्टबिन लॉट कॅन्टोनमेंट बोर्डाकडे आला. नागरिकांमध्ये त्याचे काही ठिकाणी वाटपही झाले. परंतु भिंगारमधील सातही वॉर्डांमध्ये संपूर्णपणे नागरिकांमधे डस्टबिनचे वाटप झाले नसल्यामुळे नागरिकांमध्ये  डस्टबिन वाटप बाबत उलट-सुलट चर्चा सुरू होती.
पुरवठादारांकडून डस्टबिन आल्यानंतर देऊ
पुरवठादारांकडून डस्टबिनचा अपूर्ण पुरवठा करण्यात आला. त्यामुळे  भिंगारमधील संपूर्ण नागरिकांना डस्टबिनचे वाटप झालेले नाही. मात्र उर्वरित  डस्टबिनची मागणी केली आहे. आठ ते दहा दिवसात पुरवठादारांकडून उर्वरित डस्टबिन आल्यानंतर नागरिकांना ते देण्यात येतील.
विद्याधर पवार, चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर, कॅन्टोन्मेंट बोर्ड, भिंगार.