Breaking News

श्री विशाल गणेशाच्या दर्शनाने धन्य झालो : वामनानंद स्वामी श्री विशाल गणेशाची केली आरती


अहमदनगर / प्रतिनिधी
भारतीय संस्कृतीत देव-देवता आणि देवस्थानांना अनन्य साधारण महत्व आहे. ही देवस्थाने मानवाचे प्रेरणास्थान आहेत. अखिल मानवजातीच्या
कल्याणासाठी सर्वच देवस्थानचे कार्य सुरु आहे. नगर जिल्ह्यातही शिर्डीचे साईबाबा, शनी शिंगणापुर या सारखे जागतिक स्तरावरील जागृत देवस्थान आहेत.
नगर शहरातील श्री विशाल गणेशाची मूर्ती भव्य तेजस्वीनी अशीच आहे. या श्रीगणेशाची प्रचिती सर्वदूर झाली आहे. मंदिराचे आकर्षक असे स्वरुप
भाविकांना मंत्रमुग्ध करणारे आहे. श्री विशाल गणेशाच्या दर्शनाने आपण धन्य झालो, असे उद्गार श्री चिन्मनमूर्ती संस्थान (उमरखेड) मठाधिपती
माधवानंद गुरु वामनानंद स्वामी यांनी काढले.
श्री चिन्मनमूर्ती संस्थान (उमरखेड) मठाधिपती माधवानंद गुरु वामनानंद स्वामी यांनी शहराचे ग्रामदैवत श्री विशाल गणेश मंदिरात आरती केली. याप्रसंगी देवस्थानचे अध्यक्ष ॅड. अभय आगरकर, विश्वस्त रामकृष्ण राऊत, गजानन ससाणे, संदिप कुलकर्णी आदी उपस्थित होते. यावेळी ॅड. अभय आगरकर यांनी देवस्थानच्या कार्याची माहिती देऊन वामनानंद स्वामी यांचा सत्कार केला. विश्वस्त रामकृष्ण राऊत यांनी आभार मानले. यावेळी स्वामी वामनानंद भक्त मंडळाचे सदस्य उपस्थित होते.