Breaking News

ऐन परीक्षेच्या काळात विज पुरवठा खंडीत


देवळाली प्रवरा / प्रतिनिधी
ऐन दहावी बारावी परीक्षांच्या कालावधीतच राहुरी कारखाना येथील डॉ. तनपुरे साखर कारखाना कामगार वसाहतीचा वीजपुरवठा (२५ फेब्रुवारी) रोजी दुपारी महावितरणने खंडीत केला. यामुळे   नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे. आम्ही कंदीलात अभ्यास करु, परीक्षेला सामोरे जावू, परंतू आमचे भवितव्य अंधारात जाणार असल्याने आम्ही कदापीही व्यवस्थेस माफ करु शकणार नाही. महावितरणाच्या अधिकाऱ्यांनी आमच्यावर दया दाखवून किमान परीक्षा संपे पर्यंत विज पुरवठा खंडीत करु नये अशी अपेक्षा येथील विद्यार्थ्यांनी व्यक्त केली आहे.
 डॉ. तनपुरे साखर कारखान्यास महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीकडून विद्युत पुरवठा केला जातो. या विजबिलापोटी कारखाना आपले बिल अदा करत असते. परंतु गेल्या अनेक महिन्यांचे वीज बिल थकले असून थकीत वीज बिलाचा आकडा लाखात आहे. त्यामुळे महावितरण कंपनीने वीजपुरवठा खंडीत केला आहे. सध्या दहावी बारावीच्या परीक्षांचा कालावधी असून वीज खंडीत केल्याने आता अभ्यास कसा करणार असा प्रश्न विद्यार्थी कामगार कुटुंबियांना पडला आहे. या प्रश्नी कारखाना व्यवस्थापन महावितरणाच्या अधिकाऱ्यांनी एकत्रित बैठक घेऊन तातडीने सदर प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी कामगार कुटुंबीयांनी केली आहे.
बारावीच्या परीक्षे नंतर टर्निंग पाँईंट मिळत असतो. खऱ्या अर्थाने आमच्या भवितव्याला सुरवात होणार आहे. या नंतर व्यावसायिक शिक्षण, आर्मी, पोलिस भरतीसाठी तर वैद्यकिय शिक्षणासाठी बारावीची परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक असते. वीजबिल कारखान्याने भरले नाही. शिक्षा माञ परीक्षार्थीना मिळत असल्याची खंत विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.     
-योगेश राऊत  
- आदेश तारडे (विद्यार्थी)