Breaking News

दरोड्याच्या तयारीतील दोघे गजाआड शिर्डी पोलिसांची कारवाई;देशी पिस्तुलासह सव्वालाखांचा मुद्देमाल ताब्यात


 शिर्डी/प्रतिनिधी
  दरोड्याच्या तयारीत असणाऱ्या टोळीवर शिर्डी पोलिसांनी कारवाई केली. या करावॆदरम्यान दोघे पोलिसांच्या ताब्यात आले असून इतर चौघे फरार होण्यात यशस्वी झाले. या कारवाईत पोलिसांनी एक देशी बनावटीचे काडतुसासह पिस्तुल, दोरी, सुझुकी कंपनीची मोटारसायकल, धारदार चाकू व मिरचीची पूड असा १ लाख २५ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. अंकुश परसराम पवार, सुनील विकी साबळे असे पकडलेल्या आरोपींची नावे आहेत.
   सहायक पोलिस निरीक्षक प्रविण दातरे, पोलिस उपनिरीक्षक वैभव रुपवते तसेच पो.ना.सोनवणे, पोना.वर्पे, पोना.दिनकर, पोकॉ पगारे हे कर्मचारी सायंकाळी पिंपळवाडी परिसरात साईश कॉर्नर, शिर्डी येथे नाकाबंदी करत असताना उपविभागीय पोलिस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांना गुप्त माहिती मिळाली की, पिंपळवाडी रस्त्याने शिर्डीच्या दिशेने काही इसम मोटारसायकलवरुन दरोडा किंवा जबरी चोरी करण्याच्या तयारीने येत आहे. दीपक गंधाले यांनी तात्काळ नाकाबंदी करीत असलेले सपोनि प्रविण दातरे यांना माहीती दिली. त्यानुसार सापळा रचण्यात आला. रात्री पावणेदहाच्या सुमारास दोन मोटारसायकलवरुन पाच ते सहा इसम पिंपळवाडी रोडने शिर्डी शहराच्या दिशेने येताना दिसले. परंतु पुढे पोलिस ऊभे असल्याची त्यांना जाणिव होताच पळण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्यांना पाठलाग करून पकडले.  त्यात अंकुश परसराम पवार (वय २४ वर्षे, रा. एकरुखे ता. राहाता) सुनील विकी साबळे (वय २९ वर्षे, रा . दत्तनगर , ता . श्रीरामपूर) यांना पकडले. सोनु सुधाकर पवार, रमेश तान्हाजी वायदंडे, पप्पू गाढवे, संदिप ( पूर्ण नाव माहित नाही ) असे फरार झालेल्यांची नावे आहेत. यात पोलिसांनी काडतुसासह पिस्तुल, दोरी, सुझुकी कंपनीची मोटारसायकल, धारदार चाकू व मिरचीची पूड असा १ लाख २५ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

   
  शिर्डी पोलिस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांसमवेत गुन्हेगारांवर कारवाई करत शिर्डीतील वाढती गुन्हेगारी लवकरच बंद  जाण्यासाठी प्रयत्नशील असणार आहे. 
   सपोनि. दीपक गंधाले