Breaking News

खरारे यांचा आरपीआय पक्षात प्रवेश


अहमदनगर / प्रतिनिधी
येथील युवा कार्यकर्ते सनी खरारे यांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई गट) पक्षात प्रवेश केला. शहराध्यक्ष सुशांत म्हस्के यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी पवन भिंगारदिवे, दानिश शेख, संतोष पाडळे, भिम वाघचौरे, दिनेश पाडळे, आकाश काळे, तालेवर गोहेर, नरिन तांबोली, राहुल लखन, सुरज वाणे, धिरज चव्हाण, अक्षय चव्हाण, अभिषेक चव्हाण, रोहित गोहेर, मनोज वाघमारे, लखन कंडारे, संदिप लखन आदींसह युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुशांत म्हस्के म्हणाले, की फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचाराने पक्ष आपली वाटचाल करीत आहे. सर्व समाजबांधवांना बरोबर घेऊन जाण्यासाठी पक्ष कटिबध्द आहे. सनी खरारे म्हणाले, मागासलेल्या समाजातील युवकांना दुर्लक्षित ठेवण्याचे काम सुरु आहे. डॉ. राजेंद्र गवई यांच्या विचारांनी प्रेरित होऊन  आपण या पक्षात प्रवेश करीत असून, भविष्यात युवकांची मोठी फळी उभी करणार आहोत.