Breaking News

काला हा गरीबाच्या पोटात जाणारा घास : महामंडलेश्वर आचार्य अमृताश्रम स्वामी


अहमदनगर / प्रतिनिधी
आज आपण आपल्याकडे नाही, त्यांचा विचार करत आहे. परंतू जे आहे, त्याकडे दुर्लक्ष करत आहे. समाजात सातत्याने बदल होत आहेत. त्यामुळे आपणही आपल्यात काळानुरूप बदल केले पाहिजे. प्रत्येक गोष्टीला वैज्ञानिक महत्व आहे. या कलियुगातला काला हा दीनदुर्बल, कुपोषीत,गरीबाच्या पोटात जाणारा घास आहे, असे प्रतिपादन ... महामंडलेश्वर आचार्य अमृताश्रम स्वामी महाराज यांनी केले.
जगदगुरू शंकराचार्य यांच्या आशिर्वादाने आणि . . . राहुल महाराज दरंदले यांच्या मार्गदर्शनाखाली बुरूडगांव येथील श्री आशुतोष महादेव मंदिरात अखंड त्रिदिनीय किर्तन सोहळा रुद्र स्वहकार शिवलीला अमृत पारायण सोहळ्याची . . . महामंडलेश्वर आचार्य अमृताश्रम स्वामी महाराज यांच्या काल्याच्या किर्तनाने सांगता झाली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी सोनेवाडीचे महंत शंकर भारती, ओमभारती महाराज, माजी नगरसेवक आसाराम कावरे, राजेंद्र मांडगे, रमेश इनामदार, डॉ. अभय मुथा, यादव सर, गणेश दरंदले, जालिंदर कुलट, अमित जाधव, दिनेश शेळके, दिपक भवर, शिवाजी मोढवे आणि ...राहुल महाराज दरंदले आदी उपस्थित होते.