Breaking News

डॉ. सोनाली चिने यांना पीएच.डी.

कोपरगाव/ प्रतिनिधी : तालुक्यातील कुंभारी येथील डॉ.सोनाली शंकर चिने हिने डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात रसायनशास्त्र विषयात पीएच.डी. मिळविल्याबद्दल माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांच्या हस्ते भाजपा संपर्क कार्यालयात सत्कार करण्यात आला. 
याप्रसंगी सहकार महर्षी कोल्हे कारखान्याचे माजी संचालक डॉ. गुलाबराव वरकड, तालुका अध्यक्ष साहेबराव रोहोम, उत्तमराव चरमळ, रवींद्र पोळ, अनुराग येवले यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते. या गौरवाबद्दल राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांनीही डॉ.चिने यांचा सत्कार केला असल्याचे स्नेहलता कोल्हे यांनी सांगितले.