Breaking News

वाघापूर येथे वृद्धाचा रहस्यमय मृत्यू आरोग्य शिबिरासाठी झाला होता दाखल


संगमनेर/प्रतिनिधी ः
वाघापूर येथे आरोग्य शिबिरात दाखल झालेल्या वृद्धाचा मृत्यू झाला.
बुधवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला.
संगमनेर शहराजवळ वाघापूर शिवारात सिध्दकला आयुर्वेदिक महाविद्यालयात सांधेदुखी व अन्य आजारांच्या उपचारासाठी मोफत शिबीर आयोजित करण्यात आले होते. त्यासाठी तालुक्यातील बरेच रुग्ण उपचारासाठी महाविद्यालयात दाखल झाले होते. शंकर विठ्ठल पांडे हे वृद्धही या शिबिरासाठी आले होते.
 गुडघेदुखी व अन्य आजारांच्या व्याधींमुळे त्यांच्यावर उपचार सुरु होते. यासाठी यांना शिबिरात दाखल करुन घेण्यात आले. इमारतीच्या दुसर्‍या मजल्यावरील वॉर्डात त्यांच्या खाटेची व्यवस्था करण्यात आली होती. बुधवारी (दि.26) सकाळी महाविद्यालयाच्या मागील बाजूला पांडे यांचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकाच गोंधळ उडाला. महाविद्यालय प्रशासनाने घडलेल्या प्रकाराची माहिती ताबडतोब शहर पोलिसांना दिली. महाविद्यालयातील दुसर्‍या मजल्यावरील वॉर्डाच्या खिडकीतून पडून किंवा इतर कुठल्या कारणामुळे त्यांचा मृत्यू झाला का याचा तपास पोलिस करत आहेत. घटनेची संपूर्ण माहिती घेऊन पोलिसांनी मयत पांडे यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. मयत पांडे यांच्या नातेवाईकांचा अद्याप संपर्क झालेला नाही. संगमनेर शहर पोलिस ठाण्यात याबाबत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास पोलिस करत आहेत.