Breaking News

ठिकठिकाणी पावसाचा इशारा मुंबई
पावसाला पोषक हवामान होत असल्याने विदर्भ, मराठवाड्यात शनिवारी (ता. २९) पावसाचा अंदाज आहे. पूर्व आणि पश्‍चिमेकडून वाहणाऱ्या वाऱ्याचा संगम झाल्याने बुलडाणा, अमरावतीत गारपिटीचा इशारा दिला आहे. अकोला, वाशीम, यवतमाळमध्ये मेघगर्जनेसह वादळी पाऊस; तर वर्धा, नागपूर, चंद्रपूर जिल्ह्यासह मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलका पाऊस होण्याची शक्‍यता हवामान विभागाने वर्तवली आहे.