Breaking News

डोनाल्ड ट्रम्प भेटीने काय साधणार?
सन 2000 पासून दोन दशकांमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांची प्रस्तावित भेट जमेस धरता पाच वेळा अमेरिकी अध्यक्ष भारत दौर्‍यावर आलेले असतील. सन 2000 मध्ये बिल क्लिटंन, 2006 मध्ये जॉर्ज बुश धाकटे, मग 2010 आणि 2015 मध्ये बराक ओबामा आणि आता फेब्रुवारी 2020 मध्ये ट्रम्प. भारत-अमेरिका द्विपक्षीय संबंधांच्या बदलत्या छटा या बदलत्या वारंवारितेतून सहज लक्षात येऊ शकतात. या दोन देशांमधील सामरिक आदान-प्रदान अभूतपूर्व वाढलेले आहे. गेल्या वर्षभरात अमेरिका हा चीनला मागे सारत भारताचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार बनलेला आहे. अमेरिका हा असा दुर्मीळ देश आहे, ज्याच्याबरोबर भारताचे व्यापारी आधिक्य (ट्रेड सरप्लस) आहे. हे आधिक्य 2018-19 या वर्षांत 1,685 कोटी डॉलर इतके होते. ट्रम्प यांच्या कार्यक्रमपत्रिकेवर किती विषय आहेत, हे येत्या दोन दिवसांतच स्पष्ट होईल. परंतु अमेरिकेलाच प्राधान्यफ या ट्रम्प यांच्या जगजाहीर धोरणाच्या आड ही आकडेवारी येते. तुमच्याबरोबरच्या व्यापारात आम्ही खूप नुकसान सोसत असतो,असे ट्रम्प काही वेळा आणि गेल्या चार-पाच दिवसांत तर वारंवार बोलून गेले आहेत. भारतीय अर्थव्यवस्थेचा आकार अमेरिका, चीन, युरोपीय समुदाय यांच्याइतका अवाढव्य अजून तरी नाही. त्यामुळे भारताबरोबरचे व्यापारी समीकरण दोन समतुल्य भागीदारांचे नाही, याची जाणीव ट्रम्प प्रशासनाला आहे. त्यामुळेच या भेटीत तरी कोणताही ठोस व्यापार करण्याच्या मन:स्थितीत ट्रम्प नाहीत.
सन 2000 पासून दोन दशकांमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांची प्रस्तावित भेट जमेस धरता पाच वेळा अमेरिकी अध्यक्ष भारत दौर्‍यावर आलेले असतील. सन 2000 मध्ये बिल क्लिटंन, 2006 मध्ये जॉर्ज बुश धाकटे, मग 2010 आणि 2015 मध्ये बराक ओबामा आणि आता फेब्रुवारी 2020 मध्ये ट्रम्प. भारत-अमेरिका द्विपक्षीय संबंधांच्या बदलत्या छटा या बदलत्या वारंवारितेतून सहज लक्षात येऊ शकतात. या दोन देशांमधील सामरिक आदान-प्रदान अभूतपूर्व वाढलेले आहे. गेल्या वर्षभरात अमेरिका हा चीनला मागे सारत भारताचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार बनलेला आहे. अमेरिका हा असा दुर्मीळ देश आहे, ज्याच्याबरोबर भारताचे व्यापारी आधिक्य (ट्रेड सरप्लस) आहे. हे आधिक्य 2018-19 या वर्षांत 1,685 कोटी डॉलर इतके होते. ट्रम्प यांच्या कार्यक्रमपत्रिकेवर किती विषय आहेत, हे येत्या दोन दिवसांतच स्पष्ट होईल. परंतु अमेरिकेलाच प्राधान्यफ या ट्रम्प यांच्या जगजाहीर धोरणाच्या आड ही आकडेवारी येते. तुमच्याबरोबरच्या व्यापारात आम्ही खूप नुकसान सोसत असतो,असे ट्रम्प काही वेळा आणि गेल्या चार-पाच दिवसांत तर वारंवार बोलून गेले आहेत. भारतीय अर्थव्यवस्थेचा आकार अमेरिका, चीन, युरोपीय समुदाय यांच्याइतका अवाढव्य अजून तरी नाही. त्यामुळे भारताबरोबरचे व्यापारी समीकरण दोन समतुल्य भागीदारांचे नाही, याची जाणीव ट्रम्प प्रशासनाला आहे. त्यामुळेच या भेटीत तरी कोणताही ठोस व्यापार करण्याच्या मन:स्थितीत ट्रम्प नाहीत. कदाचित तो त्यांचा अजेण्डाही नसावा. मग त्यांच्या मनात आहे काय?
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आठ महिन्यांत पाचव्यांदा भेटतील. या दोन्ही नेत्यांना त्यांच्या देशातले नेतेही इतक्या वारंवार भेटत नसतील. डोनाल्ड ट्रम्प हे इतर कंटाळवाण्या जागतिक नेत्यांपेक्षा वेगळे असून बिनधास्त बोलण्याने ते कधी धमाल तर कधी इतरांची तारांबळ उडवून देतात. आताही भारतात येण्यापूर्वी एकीकडे मोदींवर स्तुतिसुमने उधळताना ट्रम्प भारतातील आयातकरांविषयी उघडपणे नाराजी व्यक्त करीत आहेत. ट्रम्प यांचा स्वभावपिंड लक्षात घेता, याबाबत नेमका अंदाज बांधणे हीच एक मोठी जोखीम ठरते! भारतात येण्याच्या एक दिवस आधी त्यांनी ट्विटरवरून बाहुबलीरूपातील त्यांची एक चलचित्रफीत जारी केली आहे! भारतभेटीवर नेमका बाहुबली कोण, हे मात्र स्पष्ट झालेले नाही. अवघ्या 36 तासांच्या या दौर्‍यात अहमदाबाद, आग्रा आणि दिल्लीभेटीचा भरगच्च कार्यक्रम आहे. मोदी यांनी काही महिन्यांपूर्वी हाऊडी, मोदी कार्यक्रम ह्युस्टनमध्ये केला. त्याच स्वरूपाचा ङ्गनमस्ते ट्रम्पफ कार्यक्रम अहमदाबादेत होतो आहे. भारताच्या दौर्‍यावर आजवर आलेल्या इतर कोणत्याही अमेरिकी अध्यक्षांपेक्षा ट्रम्प यांचे व्यक्तिमत्त्व विविधरंगी आहे. पण त्यामुळेच त्यांच्या मनाचा थांग लागणे अवघड असते. या दौर्‍यात त्यांच्यासमवेत त्यांचे जामात जॅरेड कुशनरही आहेत. कुशनर यांनी गेली काही वर्षे ट्रम्प यांच्या पश्‍चिम आशियाविषयक धोरणाच्या घडणीत महत्त्वाचे योगदान दिलेले आहे. त्यांची उपस्थिती ट्रम्प भेटीला भूराजकीय सामरिक रंग देते. किंबहुना, सामरिक क्षेत्र, ऊर्जा आणि रोजगार व शिक्षण याच मुद्दयांपुरती या भेटीत चर्चा मर्यादित राहण्याची शक्यता आहे. या दौर्‍यात भारत आणि अमेरिका यांच्यात व्यापक व्यापार करार होण्याची दाट शक्यता आहे. त्याची तयारी मोदींच्या अमेरिका दौर्‍यातच सुरू झाली होती. हा करार दोन्ही देशांच्या हिताचा होताना आपली बाजू आक्रमकपणे मांडणे आवश्यकच असते. त्यामुळेच, ट्रम्प यांनी भारतातील कररचना अमेरिकी वस्तूंच्या निर्यातीसाठी उपयुक्त नाही, असे ट्वीटच काही दिवसांपूर्वी केले होते. या पार्श्‍वभूमीवर नमस्ते ट्रम्पची जोरदार तयारी चालू करण्यात आली आहे. मात्र, अशा सोहळ्यांना मर्यादित अर्थ असतो. शाश्‍वत असतात ते हितसंबंध आणि ते जपले जाताना व्यक्तिगत मैत्रिपूर्ण संवादाची मदत तेवढी होऊ शकते. भारत आणि अमेरिका यांच्या व्यापारी संबंधांवरून वाद होणे, याचा एक अर्थ भारत हा अमेरिकेच्या बरोबरीचा देश झाला आहे. पण अमेरिकेला जगातल्या कोणत्याही देशाला बरोबरीने वागवण्याची सवय नव्हती.
चीनने त्यांना ती सवय अलीकडे लावली आहे. तरीही, चीनविरोधी आघाडीतील दोस्तराष्ट्र असूनही ट्रम्प गेल्या काही काळात जपानशी नीट वागलेले नाहीत. भारत तर कोणत्याही संरक्षण कराराने अमेरिकेच्या छत्रछायेखाली नाही. तो अमेरिकेचा व्यापार भागीदार असला तरी कोणत्याही अर्थाने आश्रित नाही. या पहिल्या कार्यकाळात ट्रम्प यांनी सातत्याने अमेरिका फर्स्टचा पुकारा केला आहे. तो त्यांना पुढची निवडणूक जिंकेपर्यंत कायम ठेवणे, आवश्यकच आहे. त्यामुळे, भारतावर करसवलतींसाठी दडपण आणल्याची भावना अमेरिकेत निर्माण होणे, ट्रम्पना सोयीचे आहे. अर्थात, ट्रम्प हे स्वत: उद्योजक आहेत आणि त्यांच्या मनात अमेरिकेचा व्यापारी लाभ अग्रभागी असणे, स्वाभाविक आहे. यामुळेच, भारतात हर्ले-डेव्हिडसन या मोटरसायकलवर असणारा आयातकर प्रचंड आहे, अशी तक्रार अमेरिका सतत करत आहे. तसे म्हटले तर हा अगदी छोटा मुद्दा होता. यावेळी, तो आयातकर कमी झाला तर नवल नाही. खरेतर, भारत सध्या गंभीर आर्थिक संकटातून जात आहे. रोजगार कमी होतो आहे. देशांतर्गत मागणी घटली आहे. अशावेळी, अमेरिकी वस्तूंवरचा कर कमी करणे, याचा दुसरा अर्थ भारतीय उद्योगांना नख लावणे आहे. याशिवाय, भारतातल्या वाढत्या ई-विस्ताराने अमेरिकेला आर्थिक धक्का बसला आहे. त्यातच रिझर्व्ह बँकेने भारतात अर्थव्यवहार करणार्‍या सगळ्या कंपन्यांना सगळा डाटा भारतातच साठवून ठेवण्याची सक्ती केली आहे. हा एक मोठा व गुंतागुंतीचा उद्योग आहे. यातून काही मार्ग निघतो का दिसेलच. अमेरिका आणि भारत यांना सोयीचे वाटणारे करार असतात ते संरक्षण सामग्री खरेदीचे. यावर खर्च होणारा पैसा कुणाला खटकत नाही आणि अमेरिकी उद्योजकांनाही खूष करण्याचा हा खात्रीशीर मार्ग असतो. असे अनेक खरेदीकरार या भेटीत झाले तर नवल नाही. ते करताना अमेरिका पाकिस्तानच्या नाराजीची पर्वा बिलकुल करणार नाही. चीन वगळता कोणत्याही देशाशी असणार्‍या आपल्या मैत्रिसंबंधांना आता पाकिस्तानचा संदर्भ उरलेला नाही. ट्रम्प भारतात येण्याआधी व्हाईट हाऊसमधून निघालेल्या निवेदनात पाकिस्तानला पुन्हा सज्जड इशारा देण्यात आला. भारताशी चांगले संबंध ठेवायचे असतील तर आधी दहशतवादी कारवायांवर नियंत्रण ठेवा आणि त्या संघटनांना आवरा, असा इशारा अमेरिकेने दिला. हा इशारा भारत सतत घेत असणार्‍या दहशतवादविरोधी भूमिकेचे बळ वाढविणारा आहे. तो चीनलाही सूचक इशारा आहे. दहशतवादाच्या विरोधातील लढाईत आम्ही भारताची साथ देऊ, हे चीनला सुनावणे आहे. उद्याच्या जगाच्या नव्या व्यूहात्मक रचनेत भारत, अमेरिका आणि रशिया यांनी मैत्रिसंबंध वाढवून चीनच्या विस्तारवादाला वेसण घालणे, ही अत्यंत आवश्यक आणि स्वाभाविक बाब आहे. त्यामुळे, मकरोनाग्रस्त चीनचा मुद्दा मोदी आणि ट्रम्प यांच्या भेटीत निघेलच. भारताने अर्थव्यवस्था खुली केल्यानंतर आणि शीतयुद्ध संपल्यापासून खाचखळगे आले असले तरी भारत आणि अमेरिका यांचे संबंध क्रमाक्रमाने सुधारत गेले आहेत. रिपब्लिकन अध्यक्षांच्या राजवटी या नेहेमीच भारताला अनुकूल राहिल्या आहेत. या ट्रम्प भेटीनेही या संबंधांमधले पुढचे पाऊल पडेल, यात शंका नाही.