Breaking News

वीरप्पनच्या मुलीचा भाजपत प्रवेश


चेन्नई ः तामिळनाडूतील कुख्यात चंदन तस्कर वीरप्पनचा खात्मा होऊन दीड दशक झाला असला तरी त्याचे अनेक किस्से आजही चर्चिले जातात. वीरप्पनने एका अधिकार्‍याचे शिर धडापासून वेगळे केले आणि नंतर आपल्या सहकार्‍यांबरोबर त्याने त्या अधिकार्‍याच्या मुंडक्याशी फुटबॉल खेळल्याचे सांगितले जाते. अशा या कुख्यात वीरपन्नचा 18 ऑक्टोबर 2004 रोजी खात्मा करण्यात आला. आता या वीरपन्नची मुलगी विद्याराणीने भाजपत प्रवेश केला आहे. विद्याराणी या वकील आहेत भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस मुरलीधर राव यांच्या उपस्थितीत त्यांनी पक्षात प्रवेश केला.