Breaking News

'करोना' चिकनमुळे नाही ; अफवांवर विश्वास नको! जिपच्या पशुसंवर्धन विभागाचे आवाहन

अहमदनगर / प्रतिनिधी
विषाणूच्या बाधेमुळे अनेक नागरिकांचे बळी गेले. मात्र, विविध माध्यमांतून करोना विषाणूचा प्रादुर्भाव चिकनमुळे होत असल्याचा चुकीचा प्रसार केला जात असल्याचे निदर्शनास आले. यामुळे पोल्ट्री व्यावसायिकांचे मोठे नुकसान होत असून, याबाबतची वस्तुस्थिती लोकांसमोर आणावी, अशी विनंती केली जात होती. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाने अफवांवर विश्वास ठेवण्याचे आवाहन केले आहे.
यासंदर्भात प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, आपल्याकडे कोणतेही मांस शिजवल्यानंतर खाण्यात येते. शिजवलेल्या अन्नात कोणताही विषाणू जिवंत राहूच शकत नाही. त्यामुळे कोणीही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन विभागाने केले आहे. यासाठी जिल्ह्यात मोहीम राबवण्यात येत आहे, असे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. सुनील तुंबारे यांनी सांगितले. कोब्यांचे मांस खाल्ल्यास करोनाचा धोका आहे, ही पूर्णपणे अफवा आहे. नागरिकांनी याविषयी मनात असलेला संभ्रम दूर करावा, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.