Breaking News

समाजकारणामुळे आमदार लंके राजकारणात यशस्वी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचे प्रतिपादन


पारनेर/प्रतिनिधी ः
आमदार नीलेश लंके यांचे समाजकारण हे राजकारणापेक्षा मोठे आहे. त्यांनी गोरगरीब जनतेच्या प्रश्‍नांची सोडवणूक केली. त्यासाठी त्यांनी संघर्ष केला. त्यामुळे ते पारनेर तालुक्यात राजकारणामध्ये यशस्वी झाले, असे प्रतिपादन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.
पारनेर येथे आमदार नीलेश लंके यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन ग्रामविकास आणि पालकमंत्री मुश्रीफ यांच्या हस्ते शुक्रवारी झाले. अध्यक्षस्थानी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके होते. माजी आमदार दादाभाऊ कळमकर, प्रतिष्ठानचे प्रांताध्यक्ष सुदाम पवार, तालुकाध्यक्ष बापू शिर्के, अशोक सावंत, राजेंद्र चौधरी, सभापती प्रशांत गायकवाड, ज्येष्ठ नेते टी. के. मते, किसन लोटके, विक्रम कळमकर, सोमनाथ धूत, माणसिंग पाचुंदकर, राहुल झावरे, कारभारी पोटघन, दादा शिंदे, चंद्रकांत मोडवे, अरूण पवार, अशोक  घुले, राणी लंके, सुवर्णा घाडगे, पूनम मुंगसे, डॉ. कावरे, संजय भोर, ठकाराम लंके, सुरेश धुरपते, विजय औटी, राजू शेख, संजय मते, श्रीकांत चौरे, प्रितेश पानमंद, सत्यम निमसे, अंकुश म्हस्के, बंटी दाते, संदीप चौधरी व ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.
पालकमंत्री मुश्रीफ म्हणाले, पारनेर हा दुष्काळी तालुका आहे. येथील लोक शेतीवर अवलंबून आहेत. त्यामुळे अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असताना त्यांना मदत करणे हे पालकमंत्री म्हणून माझे काम आहे. त्यामुळे मी आमदार लंके यांच्या विकासकामांच्या मागे व तालुक्यातील गोरगरीब पीडित जनतेच्या पाठीमागे उभा राहील. नुसता उभाच राहणार नाही तर त्यांचे रक्षण करील. शासन स्तरावर अनेक नियमांत बदल करून त्याचा फायदा गरीब व गरजू घटकांना मिळावा यासाठी प्रयत्नशील आहे. विधवा, निराधार, वृद्ध, अपंग यांच्यासाठी विशेष योजना सध्या सुरू केलेल्या आहेत. महाविकास आघाडीच्या माध्यमातून गरिबांना दवाखाने परवडतील याकडे लक्ष देणार आहोत. त्यांना शासनस्तरावरून मदत केली जाईल. खर्च न करता त्यांच्यावर तातडीने उपचार केले जातील. यासाठी येत्या काळामध्ये प्रयत्न करणार आहे.
विधवा, परित्यक्ता यांच्यासाठी पेन्शन कायदा व 65 वर्षीय वृध्दांची सोय होण्यासाठी पेन्शन योजना लागू करण्यात आली आहे.उत्पन्नाची अट 21 हजारांवरून 50 हजार तर एक हजारावरून दोन हाजारावर ही पेन्शन नेणार आहे, असे आश्‍वासनही मुश्रीफ यांनी दिले.
आमदार नीलेश लंके म्हणाले, माझ्या घरात पिढीजात कोणीही राजकारणी नसल्यामुळे मला देखील मार्गदर्शन करावे. माझ्या तालुक्याला विकासकामांसाठी झुकते माप द्यावे. माझ्या माता भगिनींच्या डोक्यावरील पाण्याचा हंडा उतरवण्यासाठी व पारनेर तालुक्यातील दुष्काळी तालुका ही ओळख पुसण्यासाठी आपण सर्वतोपरी माझ्या पाठीशी राहावे, असेही ते म्हणाले.
नगरपंचायतचे राष्ट्रवादीचे स्वीकृत नगरसेवक म्हणून विजय वाघमारे यांची निवड झाली आहे. तसेच शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी कविता औटी यांची निवड झाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे उपतालुका प्रमुख अंकुश म्हके झाले. या सर्वांना पालकमंत्र्यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.