Breaking News

शिवजयंतीनिमित्त मोतीबिंदू निदान शिबिर

बेलापूर/प्रतिनिधी : शिवजयंतीचे औचित्य साधून (दि. 19) भागवत प्रतिष्ठान व स्वस्तिक ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने आणि के.के.आय (बुधराणी) हॉस्पिटल, पुणे यांच्या सहकार्याने काळे हॉस्पिटल, गणपती गल्ली, बेलापूर बु. या  ठिकाणी  48 वे मोफत मोतीबिंदू निदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. 
शिबिराचे उदघाटन प्रवासी संघटनेचे अध्यक्ष रणजित श्रीगोड यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी डॉ. सुधीर काळे, डॉ. संपदा काळे, हरिभाऊ मंत्री, बुधाराणी हॉस्पिटलच्या मीरा पटारे यांच्यासह पेशंट मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी डॉ. संपदा काळे यांनी डोळ्यांची निगराणी व त्यासाठी आवश्यक आहार याबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले. श्रीरामपूर येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते झनकभाई आशर यांनी शिबिराला सदिच्छा भेट देऊन मागील 48 महिन्यांपासून अविरत सुरू असलेल्याला या उपक्रमाचे कौतुक केले. या शिबिराचा नगर जिल्ह्यातील पेशंट बरोबरच सिल्लोड, बुलढाणा येथील पेशंटने देखील लाभ घेतला.