Breaking News

जिओ ची केबल जप्त राक्षसवाडी बुद्रुक येथील वनविभागात कारवाई


कर्जत/शहर प्रतिनिधी :
कर्जत तालुक्यातील राक्षसवाडी बुुद्रुक येथील वनविभागाच्या जंगलातून जिओ व ओएफसी केबल जप्त करण्यात आली.
विनापरवाना ही केबल वनविभागाच्या क्षेत्रातून नेल्याचे कळताच वनक्षेत्रपाल गणेश छबिलवाड यांनी ही कारवाई केली.
 राक्षसवाडी बुद्रुक येथील वनविभागाच्या क्षेत्रात विनापरवाना
खोदकाम करून केबल टाकण्यात आली होती. ही केबल गट नंबर 30 वनविभागाच्या ताब्यातील जंगलामधून भूमिगत करण्यात आलेली होती. यासाठी जिओ कंपनीने रात्रीच्या वेळेस खोदकाम केलेले होते. ही माहिती
कर्जतचे वनक्षेत्रपाल छबिलवाड यांना मिळाली. त्यांनी जंगलात पुरलेली केबल जेसीबीच्या साहाय्याने  उकरून काढून जप्त केली. संबंधितांवर वनविभागाच्या कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई वनक्षेत्रपाल छबिलवाड, अनिल खराडे, सुरेश भोसले, किशोर गांगर्डे, किसन पवार, विष्णू राठोड, अशोक काकडे, के. ई. नजन, देवकर यांनी केली.